यावेळी बोलताना व्यासपीठावर पिरळेचे सरपंच सुनील दडस माजी सरपंच, संदीप नरळे चेअरमन, वसंत दडस माजी सरपंच, शिवाजी लवटे माजी उपसरपंच, अमोल बापू शिंदे, दत्तू लवटे, दादा लवटे, उमेश खिलारे जिल्हा परिषद गटप्रमुख अनिल दडस, पिरळे शाखाप्रमुख आकाश खिलारे, उपप्रमुख उमेश जाधव, दहिगाव जिल्हा परिषद गटाचे प्रमोद चिकणे, नातेपुते नगरपंचायतचे गटनेते दादाभाई मुलाणी, प्रभाग ७ प्रमुख सनी बरडकर, जय महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत, उपाध्यक्ष राजू जाधव, सचिव माऊली देशमुख व शेकडो ग्रामस्थ बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी शासन आपल्या दारी ही योजना आणून सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे. सावंत साहेब व सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात डाळ नागरिकांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये आत्तापर्यंत 75000 पेक्षा जास्त माता-भगिनीने लाभ घेतलेला आहे. त्याचा प्रतिसाद पाहता आपण लवकरच दोन लाखाचा टप्पा सुद्धा गाठू. त्याचबरोबर शासनाची प्रत्येक गोष्ट जर प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांने लोकप्रतिनिधींनी अशापद्धतीने जर योजना राबवल्या तर शासन लोकाभिमुख झाल्याशिवाय राहणार नाही.
त्याचबरोबर जनतेची प्रशासनातील अधिकारी, मधले दलाल यांच्याकडून त्यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबणार आहे. यावेळी बोलताना पत्रकार प्रमोद शिंदे यांनी आठवण करून दिली 2008 ला पडलेल्या प्रचंड दुष्काळामध्ये पिरळेगावासाठी पाण्याचा टँकर सुरू करून एक समाजाप्रती असलेली निष्ठा, सामाजिक जाणीव याचा प्रत्यय आला होता. आज पण राजकुमार हिवरकर-पाटलांच्या माध्यमातून आरोग्य विषयक हा आरोग्यदूत निर्माण झालेला आहे. गोरगरिबांसाठी तात्काळ उपलब्ध होणारे नेतृत्व आहे. यावेळी माजी सरपंच संदीप तात्या नरळे यांनी मनोगत व्यक्त केलं.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१