![]() |
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री.रणजितसिंहदादा नाईक-निंबाळकर यांची शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या शिवसेना भवन कार्यालयास भेट |
संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
माढा लोकसभा मतदारसंघाचे कलियुगातील भगीरथ म्हणून ज्यांची ओळख आहे असे खासदार माननीय श्री.रणजितसिंहदादा नाईक-निंबाळकर यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे धडाडीचे शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या शिवसेना भवन या कार्यालयात भेट देऊन राजकुमार हिवरकर-पाटील यांना तसेच शिवसेनेचे नेते पदाधिकारी शाखाप्रमुख व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.
कलियुगातील भगीरथ अशी ओळख असणारे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिवाळीच्या पूर्व संधेला माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या नातेपुते येथील शिवसेना भवन येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तालुकाप्रमुख या नात्याने शिवसेनेने माळशिरस तालुक्यामध्ये केलेल्या कामाचा कार्य अहवाल पाहिला व पाहताक्षणी त्यांच्या असे निदर्शनास आले की, एवढ्या सगळ्या बातम्या एवढी सगळी कामे बघून खूप कौतुक केले, कलियुगातील भगीरथ म्हणून ओळख असणारे खासदार यांनी राजकुमार हिवरकर-पाटील यांना शब्द दिला की, माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी जी काही कामे करावी लागतील त्यासाठी मी पुरेपूर आणि जास्तीत जास्त तुम्हास सहकार्य करण्यास तयार आहे.
आरोग्य विभाग तसेच आरोग्य संबंधीच्या वैद्यकीय मदतीसाठी राजकुमार हिवरकर-पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतुक खासदार साहेबांनी केले. तालुक्याच्या विकास कामांसाठी निधीची लागणारी मदत देण्याचे त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील, गटनेते दादाभाई मुलाणी, नातेपुते शहर प्रमुख पोपटराव शिंदे, प्रभाग ७ चे प्रमुख सनी बरडकर, शशिकांत बरडकर, भाजपचे मनोज जाधव, युवा मोर्चाचे तेजस गोरे, धनंजय हिवरकर-पाटील, जयकुमार शिंदे, स्वीय सहाय्यक शिंदे, सतीश बरडकर आदी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१