Skip to main content

डॉ.बा.ज.दाते प्रशाला व माध्यमिक महाविद्यालयातील सन २०००-२००१ बॅचचा माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

दि.१६-११-२०२३ रोजी नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील डॉ.बा.ज.दाते प्रशालेतील सन २०००-२००१ दहावी बॅचचा माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी या स्नेहमेळाव्याला प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी  २२-२३ वर्षांनंतर एकत्र आल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. जुने मित्र भेटल्याने शाळेतील आठवणी जाग्या झाल्या. कार्यक्रमाची रूपरेषा शाळेच्या वर्गासारखी असल्याने सर्वांना शाळेत घालवलेले जुने क्षण आठवले. या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणांहून विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. 

तसेच या स्नेह मेळाव्यानिमित आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, शिक्षकांचे मनोगत तसेच विद्यार्थ्यांचे मनोगत घेण्यात आले व  विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. फनी गेम्स, मनोरंजन कार्यक्रम, स्नेह भोजन इ. कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

यावेळी या स्नेह मेळाव्यानिमित आलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमाला टोमके मॅडम, मदने मॅडम, एम. पी कुलकर्णी मॅडम, मुल्ला मॅडम, एचके कुलकर्णी सर, पिसे सर, बडवे सर, एन.बी.दिक्षित सर, भरते सर, बांगर सर, खडतरे सर, परचंडे सर, कसबे सर, काळे सर, गोरे सर, डांगे सर, कुचेकर सर, ढोपे सर, गोसावी सर, व्ही.के.देशपांडे सर तसेच प्रशालेतील शिपाई जठार मामा, वाघ मामा, लांडगे मामा, खंडू मामा  व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

९४२०३०२५६१

 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.  

  

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...