मा.श्री.डॉ.अभिमन्यू बी. आठवले संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र |
संपादक : मा.श्री.डॉ. अभिमन्यू आठवले
(साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
कोणतेही सरकार असू द्या त्या सरकारचे अधिकारी, कर्मचारी यांना "ना भीती ना चिंता'' असे अंग वळणी प्रत्येक विभागातील यांना पडले आहे. अधिकारी, कर्मचारी हे आर्थिक चिरीमिरीची अपेक्षा ठेऊन असतात. अधिकारी व कर्मचारी भरमसाठ पगार असताना सुद्धा चिरीमिरीची वाट बघतात या मध्ये ग्रामपंचायत शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी टक्केवारीचे भुकेले असतात. त्यामध्ये महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी जोमात असतात ''द्या आणि करून घ्या'' असे समीकरण आहे. दुय्यम निबंधक यांच्या मार्फत जागा, जमिनी शासकीय स्टॅम्प वरती आर्थिक व्यवहार केलेला असतो. नियमानुसार फी भरलेली असते तरीही गाव पातळीवरील तलाठी, सर्कल नोंदी धरण्यास टाळाटाळ करतात, ते आर्थिक चिरीमिरीची अपेक्षा ठेवतात ही वेदनादायी आहे. हे जनतेचा छळ, मानसिक त्रास करतात असे संपादक म्हणून अनुभवले आहे, पाहिले आहे.
जे दिसते तेच मी निर्भिडपणे मांडतो. सगळेच अधिकारी, कर्मचारी चिरीमिरी घेतात असे नाही. ५०% टक्के असे आहेत ज्यांना भरमसाठ पगार असताना सुद्धा चिरीमिरीसाठी जनतेचे काम हातात असताना सुद्धा करीत नाहीत हे सत्य आहे. चिरीमिरी घेणारे अधिकारी, कर्मचारी, गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. फक्त पगार सोडून आर्थिक चिरीमिरी पाहिजे असते हे अपेक्षा असते. मला आज पर्यंत कोणीही चिरीमिरी मागतली नाही, अधिकारी मला मानपान सन्मान देतात, मला चिरीमिरी मागितली तर त्याचे गाल लाल करण्याची धमक माझ्याजवळ आहे.
यात जनतेची चूक नसते, चुकतात ते अधिकारी, कर्मचारी. लालसा ही सवय लागलेली असते म्हणून हे अधिकारी संपतीचे धन दांडगे असतात. त्यांच्याकडे शेती, बंगले, महागाड्या गाड्या, सोने चांदी, मुबलक पैसा जळता जळत नाही अशी संपत्ती असते. ही लालसा अधिकारी कर्मचारी यांच्याकडून सुटेल असे वाटत नाही. यामध्ये साखळी पद्धत असते "खा गड्या खुशाल खा" म्हणत बसावे लागत आहे. चूक जनतेची समजली जाते घ्या पण लवकर काम करा यामुळे अधिकारी, कर्मचारी सोकले आहेत.
तसेच तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, ज्यांच्या नोंदी अधिकारी वेळेनुसार करत नाहीत, टाळाटाळ करतात त्यांनी साप्ताहिक बहुजन भूषण कार्यालयास संपर्क साधावा.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१