दि.१४/११/२०२३ दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दहिगाव मधील अलंकापुरी येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन दिमाखात पार पडले. यासाठी जिल्हा परिषद गटप्रमुख प्रमोद चिकणे, अध्यक्ष विजय ढेकळे, उपाध्यक्ष सागर वलेकर त्याचबरोबर गणेश गोफने, महेंद्र वलेकर हर्षवर्धन देशमाने, ओंकार पुष्पे, ओंकार खिलारे, सचिन वलेकर, धुळदेव ओलेकर, आनंद वलेकर, किरण वलेकर, शंकर ओलेकर, शंकर काळे आधी शिवसैनिक उपस्थित होते.
शाखेचे उद्घाटन सोहळा माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार पाटील यांच्या हस्ते पार पडला. शिवसेनेच्या माध्यमातून जी विकासाची कामे, समाज उपक्रम समाजाला तालुक्यात दिसायला लागली त्यालाच साद घालत वेगवेगळ्या गावचे तरुण शिवसेनेकडे आकर्षित होताना दिसतात. खऱ्या अर्थाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला कानमंत्र्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या पद्धतीने शिवसेनेचे काम चालू आहे. माझ्या तालुक्यात शिवसेनेच्या वतीने शंभर टक्के समाजकारणाचे काम चालू आहे त्यामुळे समाजातील युवक वर्गाला तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून शिवसेनेचे शाखा काढण्याकडे कल वाढलेला पाहून शिवसेना बळकट होत चालल्याचं चित्र पाहायला मिळते ते खूप महत्त्वाचा आहे.
आपण दहिगावसाठी ग्रामस्थांच्या मागणीवरून प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच मंजूर करण्यासाठी सन्माननीय आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे जिल्ह्याचे संपूर्ण प्रमुख शिवाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढून माता-भगिनी यांची ज्येष्ठ नागरिकांची नवजात मुला-मुलींच्या आरोग्याची सोय गावातच करण्याचा मानस आहे असे राजकुमार हिवरकर पाटील यांनी सांगितले.
यावेळी मात्र तालुका प्रमुख राजकुमार घोरपडे पाटील यांनी अलंकापुरी दहिगाव शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दहिगाव जिल्हा परिषद गटप्रमुख श्री.प्रमोद चिकणे सर तसेच जिल्हाप्रमुख गटप्रमुख अनिल दडस साहेब, भाजपाचे सतीश आप्पा बरडकर तसेच परळी शहर शहराध्यक्ष आकाशजी खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१