उपसंपादक: वैभव आठवले, साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
कु.प्रवीण संजय जाधव या विद्यार्थ्याला हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पेठ वडगाव कोल्हापूर येथे बी.ए.एम.एस या वैद्यकीय कोर्ससाठी शासकीय कोट्यातून फ्री मध्ये प्रवेश मिळाला त्याबद्दल त्याचा व वडील संजय जाधव सह मामा विशाल कुलकर्णी यांचा सत्कार शिवसेना भवन माळशिरस तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्याहस्ते पार पडला. घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असताना वडील नातेपुते येथील पांढरे इलेक्ट्रॉनिक या दुकानात मजुरीने जातात. आई चंद्रप्रभू इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिपाई कामगार म्हणून कार्यरत आहे. एवढी हालाखीची परिस्थिती असताना देखील कोणतेही ट्युशन नाही, कोणतेही क्लासेस नाहीत. एकविसाव्या शतकात टीव्ही, मोबाईलला समाजात दोष दिला जातो परंतु प्रवीण याने मोबाईलकडे बघणाऱ्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले असे म्हणावे लागेल. कारण याच मोबाईलच्या माध्यमातून युट्युबच्या माध्यमातून अभ्यास करून त्याने तब्बल 457 गुण मिळवले, त्याचे ऍडमिशन मोफत झाले आहे.
शिवसेनेच्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, कार्यसम्राट आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब, शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के समाजकारण या कानमंत्र्यांने शिवसेनेची वाटचाल चालू आहे. त्यामुळे असे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रात सत्कार करून वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्यांची मुल डॉक्टर म्हणून दिसतील आणि समाजहित जोपासण्याचा छंद ते या सत्कारातून प्रेरणा घेतील असा मला विश्वास आहे असे मत शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी व्यक्त केले. आतापर्यंत वेगवेगळ्या गुणवंताचा सत्कार शिवसेना भवनावर पार पडला आहे.
यावेळी माळशिरस तालुका उप प्रमुख नितीन कोरटकर, प्रगतशील शेतकरी राजेंद्र जठार, वडील संजय जाधव, मामा विशाल कुलकर्णी, भाजपाचे तेजस गोरे दहिगाव, जिल्हा परिषद गटाचे प्रमुख प्रमोद चीकणे, शिवसेनेचे शहर प्रमुख पोपट शिंदे, शिवसेनेचे गटनेचे दादाभाई मुलाणी आदी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१