या बैठकीला मार्गदर्शन करताना मा.श्री.अॅड. माजी आमदार रामहरी रूपनवर साहेब |
उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी 17 नोव्हेंबर रोजी अंबड जिल्हा जालना येथे ओबीसी समाजाचा एल्गार पुकारलेला आहे या सभेच्या नियोजनासाठी शंकरराव कॉम्प्लेक्स नातेपुते ता.माळशिरस याठिकाणी ओबीसी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली.
यावेळी विधान परिषद माजी आमदार रामहरी रुपनवर, एडवोकेट बी वाय राऊत, अध्यक्ष ओबीसी मोर्चा भाजपा, श्री राजकुमार हिवरकर पाटील तालुकाप्रमुख शिवसेना, श्री रावसाहेब पांढरे नगरसेवक, भीमराव फुले जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, सौ सीमाताई एकतपुरे, एडवोकेट राऊत वेळापूर, ऍडव्होकेट ताठे वेळापूर, श्री सोमनाथ पिसे शेतकरी संघटना, देविदास ढोपे सरपंच पुरंदावडे पोपट बोराटे, सरपंच फोंडशिरस सुनील गोरे तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा राष्ट्रवादी, संभाजी फुले सर, कैलास बरडकर, अर्जुन जठार, विनायक शिंदे, नारायण बोराटे, उत्तम बरडकर अशोक राऊत संदीप बरडकर समाधान माळी उमाजी बोडरे जिल्हाध्यक्ष उमाजी नाईक रामोशी संघटना शिवाजी कोळी तंटामुक्ती अध्यक्ष, सुधाकर राऊत, नारायण बोराटे, भाजपचे मनोज जाधव, तेजस गोरे, सावता बोराटे समता परिषद अध्यक्ष, सतीश बरडकर, भैय्यासाहेब चांगन बाळासाहेब गोरे शिवसेनेचे अनिल दडस पोपट शिंदे फंटा टेंबरे हनुमंत तात्या जठार बाबा शेंडे नरवीर उमाजी नाईक संघटनेचे बाबा बोडरे.
या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये विलास किसन क्षीरसागर या ओबीसी बांधवांचा मृत्यू झाला या घटनेचा निषेध करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी मार्गदर्शन करताना ओबीसी समाजाला आजची परिस्थिती बिकट आहे समाजावर मोठे संकट आले आहे ओबीसी समाजाला भीती दाखवण्याचे काम चालू आहे त्यामुळे ओबीसी समाजाने सामाजिक लढाई एकत्रित येऊन लढले पाहिजे दुबळे राहून चालणार नाही दहा नंबरी नागासारखा फणा काढला पाहिजे मोठी भीती सरकारला निर्माण झाली आहे आरक्षण म्हणजे गरीबी निर्मूलनाचा मंत्र नसून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुर्लक्षित समाज प्रवाहात आणण्याचा अधिकार दिला आहे अंबड येथे होणाऱ्या एल्गार परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्ती दाखवण्याची गरज असल्याची त्यांनी सांगितले आहे.
यावेळी राजकुमार हिवरकर पाटील प्रमूख माळशिरस तालुका शिवसेना यांनी माळशिरस तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे ते सांगून अंबड येथील महा एल्गार परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
त्याचबरोबर सीमाताई एकतपुरे रावसाहेब पांढरे सोमनाथ पिसे अरविंद राऊत ॲड.राऊत वेळापूर सोमनाथ यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन संभाजी फुले यांनी केले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१