उपसंपादक : वैभव आठवले, बहुजन भुषण वृत्तपत्र
पदवीधर बंधू -भगिनींनो, आता प्रश्न फक्त उमेदवार निवडण्याचा नाही, तर तुमचा आवाज विधान परिषदेत कोण बुलंद मांडणार हा आहे
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या रिंगणात रोख ठोक, निर्भीड, कधी मवाळवादी, कधी जहालवादी आणि शोध पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेला संपादक, पत्रकार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, गैरप्रकार आणि सर्वं सामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आदर्श काम केले आहे. सत्य समोर आणताना दबाव आला, विरोध झाला, अडचणी आल्या परंतु सत्यासाठी लढण्याची भूमिका कधीही सोडली नाही.
आज हाच लढा पुणे पदवीधर मतदार संघातील लाखो पदवीधरांच्या हक्कासाठी पुढे नेण्याचा माझा निर्धार आहे.
पदवी मिळाल्यानंतर अनेक तरुण -तरुणी बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, भरती प्रकियातील विलंब, शिक्षणाचा वाढता खर्च, खाजगी क्षेत्रातील असुरक्षित रोजगार, कौशल्य असूनही संधीचा अभाव आणि सरकारी योजनापर्यंत पोहोचण्याच्या अडचणीना सामोरे जात आहे.पदवीधरांच्या प्रकियामध्ये मी केवळ निवडणुकी पुरता दिसणारा उमेदवार नाही. पदवीधरांच्या सुखात-दुःखात, प्रश्नामध्ये आणि संघर्षात सतत उभा राहणारा लोकप्रतिनिधी आहे आणि असला पाहिजे.
माझी भूमिका स्पष्ट आहे
पदवीधरांना वापरा आणि निवडणूक संपल्यानंतर विसरून जा अशी माझी कधीच भूमिका राहणार नाही.
तुमच्या प्रश्नासाठी विधान परिषदेत आवाज उठविणे, संबंधीत विभागाकडे पाठपुरावा करणे प्रश्नाचा अभ्यास करून शासनाचे लक्ष वेधने आणि पदवीधरांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणे ही बांधीलकी आहे.
मी संपादक पत्रकार म्हणून प्रश्न विचारले, आज लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न सोडविण्यासाठी लढण्याची वेळ आली आहे. माझ्यासाठी ही निवडणूक पद, प्रसिद्धी मिळविण्याची संधी नाही, ही निवडणूक पदवीधरांच्या हक्कासाठी संघर्षाची सुरुवात आहे
पदवीधर बंधू भगिनींनो -तुमचे मत केवळ एका उमेदवाराला दिलेले मत नाही, ते तुमच्या प्रश्नांना तुमच्या भवितव्याला आणि तुमच्या हक्काच्या लढ्याला दिलेले बळ आहे म्हणून या निवडणुकीत विचारपूर्वक निर्णय घेऊन लाख मोलाचे पवित्र मत मला द्या, मी रोखठोक पत्रकारिता करीत आहे, आता रोखठोक पणे पदवीधरांचा आवाज विधान परिषदेत मांडण्यासाठी मला संधी द्या.
"पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी "
गेली सहा महिने पूणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील 15,170पदवीधर बंधू-भगिनींच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.
"मतपत्रिकेवरील अनुक्रमांक १४ समोरील चौकटीत '१' हा आपला प्रथम पसंतीक्रम नोंदवून प्रचंड बहुमताने विजयी करा!"आपला नम्र,अभिमन्यु भानुदास आठवलेउमेदवार, पुणे पदवीधर मतदार संघ
.jpg)

