राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) |
संपादक
राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.श्री.संघर्षमय
क्रांतिकारी नेता म्हणजे महादेवरावजी जानकर साहेब होय. ६ जानेवारी पत्रकार दिन व नूतन
वर्षाच्या शुभेच्छा. साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे निर्भीड व सडेतोड संपादक पत्रकार
श्री.अभिमन्यु आठवले यांना जानकर साहेबांनी
शुभेच्छा दिल्या. माणुसकीची “नाळ” जपणारे, माणूसपणा असलेले,
सर्व समाजप्रिय. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे मा.महादेवरावजी जानकर साहेब आहेत. संपर्कात
आलेला माणूस म्हणजे माझ्यासाठी “वरदान” आहे असे साहेबांचे मत आहे. कार्यकर्त्यात सतत
मिळून मिसळून राहणारे असे जानकर साहेब आहेत. जानकर साहेब म्हणजे सर्व समाजप्रिय असलेले
व सर्व लहान थोर यांना आदर देणारे, प्रेमाने जवळ घेणारे,
पाठीवर थाप मारणारे, जवळ आलेला कार्यकर्ता असो वा कोणताही व्यक्ति असो त्यांना
जिव्हाळा, आपुलकी, जोडलेले नात ठेवणारे आहेत. ते नात परक होणार
नाही अशी खबरदारी घेणारे नेते मा.महादेवरावजी जानकर साहेब होय. जनतेशी जोडलेला माणूस
म्हणून जानकर साहेबांकडे भारत देश पाहत आहे. साधी राहणी,
उच्च विचारसरणी, सतत कार्यकर्त्यात मिसळणारे नेते म्हणून नामवंत,
गुणवंत, कीर्तीवंत, यशवंत असे ठरत आहेत. दिनांक ६ जानेवारी हा
बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन असल्यामुळे व नवीन वर्ष चालू झाले असल्यामुळे
राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक माजी कॅबिनेट मंत्री मा.महादेवरावजी जानकर साहेब यांनी
बहुजन भूषणचे संपादक पत्रकार यांना आपल्या मोबाईल वरून नवीन वर्षाच्या व पत्रकार दिनाच्या
शुभेच्छा दिल्या. साहेबांची असलेली माणूसपणाची माणुसकी बरेच काही सांगून जाते. असंख्य
नेते मी पाहिले आहेत. परंतु कार्यकर्ते व जपलेली मानस साहेबांपासून कधीच दूर जाणार
नाहीत. साहेबांना कधी गर्व नाही. रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेतात.
जेथे राहता येईल तेथेच मुक्काम करतात. मग ओसाड रान असेल,
रस्ता असेल तसेच जे मिळेल ते खाऊन प्रवास करतात त्यामुळे नेता असावा तर असा. या नेत्यासारखा
नेता मी अद्याप पाहिला नाही. जे नेते आहेत ते मिजास करणारे नेते आहेत. मा.महादेवरावजी
जानकर साहेबांनी धरलेली मानस त्यांच्यापासून कधीच दूर जाणार नाहीत हे माझ्यावरुन मी
पाहत आहे. नवीन वर्षाच्या व ६ जानेवारी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी साहेबांनी
फोन केला हा माझ्यासाठी सन्मानच मी समजतो. जनतेचे हित,
जनतेसाठी, हक्कासाठी संघर्षमय जीवन घालवीत आहेत. मनाचा मोठेपणा असलेले
नेतृत्व, कर्तुत्व जनतेसाठी मायेची सावली ठरत आहे. साहेब लवकर खासदार
व्हावेत हिच अपेक्षा आहे. साहेबांना आठवले परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.