लोकमंगल सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर शाखा नातेपुते येथे पत्रकार दिन साजरा |
संपादक
६ जानेवारी हा आचार्य बाळशास्त्री
जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन असतो त्या निमित्ताने मा.आ.सुभाष(बापू) देशमुख, माजी मंत्री, सहकार मदत व पुनर्वसन महाराष्ट्र
राज्य यांनी स्थापन केलेल्या लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर शाखा
नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता. या
पत्रकारादिनानिमित्त लोकमंगल पतसंस्थेकडून पत्रकारांना फाईल,
न्यापकिन व गुलाबपुष्प, कॅलेंडर इ. देवून सन्मान करण्यात
आला. यावेळी माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.पी.मोरे साहेब,
श्री.सुधीर काळे, श्री.औदुंबर कदम,
श्री.उमेश पलंगे, श्री.अतुल दोशी उपस्थित होते. या पत्रकारदिनानिमित्त
सुधीर काळे यांनी मनोगत व्यक्त केले की, पत्रकारांचा सन्मान
लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने होत आहे आम्ही आमचे भाग्य समजतो. लोकमंगलने नेहमीच
पत्रकारांना मान सन्मान दिला आहे. नातेपुते शाखेला अगदी काही महीने झाले आहेत असे
असताना या पतसंस्थेवरती ठेवीदारांनी विश्वास ठेवून एक कोटी पर्यंत डीपोझिट झाले
आहे व कर्ज वाटप ८० लाख रुपये झाले आहे. अशी पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे. या कार्यक्रमावेळी
डॉ.एम.पी.मोरे म्हणाले की, बँका असताना अगर पतसंस्था असताना
कोणत्याही बँकेने अथवा पतसंस्थेने पत्रकारांचा सन्मान केलेला दिसून आला नाही.
परंतु लोकमंगल पतसंस्थेने पत्रकारांचा सन्मान केला हा आदर्श पतसंस्थेचा
घेण्यासारखा आहे. पत्रकाराने निर्भीडपणे पत्रकारिता करावी,
दिसेल तेच लिहावे. अन्याय होत असेल वाईट घडत असेल तर पत्रकाराने लेखणीद्वारे आवाज
उठविला पाहिजे त्यामुळे न्याय मिळेल. नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयातील
असलेल्या अडचणी त्याबाबत पत्रकारांनी आवाज उठविला. रुग्णालयात भेडसावणार्या सोयी
सुविधा उपलब्ध झाल्या, त्यामुळे रुग्णांची सोय झाली, त्यांना आधार वाटू लागला असे म्हणाले व पत्रकारांना पत्रकारदिनानिमित्त
शुभेच्छा दिल्या. यावेळी शाखाधिकारी मा.रमेश छपरे, शशिकांत
भद्रे, स्वाति कुंकारी, शितल काटकर, विठ्ठल पोटे, स्वप्नील धाइंजे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी पत्रकार बांधव उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.