उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
महायुतीकडून महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक मतदार संघात समन्वयक पदी शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारसाहेब, यांच्याकडून समन्वयकच्या निवडीची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांची माळशिरस तालुका समन्वयक पदी निवड केली गेली.
मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांनी शिवसेना शिंदे गट यांचे "गाव तेथे शाखा" काढून शिवसेना वाढवली. शिंदे गटाच्या शिवसेनेला उभारी देण्याचे काम हिवरकर-पाटील यांनी केले आहे. जेवढे महाराष्ट्र राज्यात शिंदे गट शिवसेना यांचे काम नाही तेवढे काम शिवसेना शिंदे गट पक्षाचे माळशिरस तालुक्यात राजकुमार हिवरकर-पाटील यांच्यामुळे आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना नेते हिवरकर-पाटील यांचे माळशिरस तालूक्यात प्रचंड काम आहे त्याची दखल घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघाच्या समन्वयक पदी मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांची निवड केली त्याबदल माळशिरस तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.