उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते, "राष्ट्रीय सेवा योजना" विभागाच्यावतीने युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या निर्देशानुसार दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविला जात असणारा "स्वच्छता हीच सेवा" या मोहिमेअंतर्गत 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' हा उपक्रम अंतर्गत नातेपुते नगरपंचायत पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली, विठ्ठल मंदिर व परिसर स्वच्छता करण्यात आला, तसेच त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना दिन 'स्वच्छ भारत' अभियानाची शपथ घेण्यात आली.
यावेळी प्रा.डॉ.डी.एस.थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. अशाप्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयात करण्यात आले. या अभियानाची सांगता म्हणून आज बुधवार दिनांक ०२/१०/२०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमापूर्वी महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आले. तसेच महाविद्यालय परिसरातील प्लास्टिक जमा करून त्याचे निर्मूलन केले. यावेळी निवृत्त प्रा.एम.बी.सावंत यांनी 'राष्ट्रपिता महात्मा गांधीचे जीवन चरित्र' व प्रा.डॉ.बी.टी. निकम यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. उत्तम सावंत यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. वैभव गवळी यांनी केले, तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.जे.डी. मुळीक यांनी मानले.
सदर कार्यक्रमास प्रा. एस.आर. नलवडे,प्रा. एस.एच.पवार, प्रा.डॉ.डी.जी.शहाणे, प्रा.डॉ.राज खंदारे, प्रा. हसन मोगल, प्रा. शिवाजी बर्गे, प्रा.माळी, प्रा.सौ.पुष्पा सस्ते, प्रा. सौ.मोगल, ग्रंथपाल प्रा.शिंदे, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या चेअरपर्सन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या मा. पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.