संपादक : अभिमन्यु बी. आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्ध केलेल्या व संपादक यांच्या हाती लागलेल्या नकाशानुसार, दसरा सण झाला, दीपावली सण सुरु होत आहे हे जनतेसाठी आनंदाचे सण आहेत परंतु नातेपुते नगरपंचायतने शेती धारक व प्लॉट धारक यांना माहिती न देता नकाशा प्रसिद्धी करून झोप उडवली आहे. शेती धारक व प्लॉट धारक यांचे प्रचंड नुकसान होणार आहे, बेघर होणार आहेत, शेती धारक व प्लॉट धारक आपले कसे होणार? यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर केले आता यापुढे शेती धारक व प्लॉट धारक यांना उध्वस्त करून नगरपरिषद करायची आहे काय? नगरपरिषद करायची असल्यास नातेपुते नगरपंचायतला लागून असलेली गावे मोरोची, कारुंडे, व इतर गावे घेणार का?, असे संपादक व संघटनेचा संस्थापक म्हणून वाटते.
शेती धारक व प्लॉट धारक यांनी त्वरित गट नंबरचे ७/१२ उतारे, तसेच असिसमेंट उतारे काढून त्यावरती बाधित क्षेत्र असा उल्लेख आहे का? यासाठी उतारे काढून बघावेत व आपले म्हणणे नातेपुते नगरपंचायतकडे लेखी द्यावे. शेती धारक व प्लॉट धारक यांना देशोधडीला लावून रस्ते करणे, बगीचे करणे हा विकास समजावा काय? दीपावली सणाच्या तोंडावर नातेपुते नगरपंचायतने जनतेची झोप उडवली आहे असे करण्यामागचा सूत्रधार कोण? त्याचा शोध घेणे महत्वाचे आहे.
शेती धारक व प्लॉट धारक सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, लोकशाही मार्गाने आंदोलने केली पाहिजेत, सध्या लागलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला पाहिजे हे शेती धारक व प्लॉट धारक यांनी लक्षात घ्यावे. आपण आवाज उठविला नाही तर येणाऱ्या काळात आपल्या डोळ्यादेखत घरादारावर व शेतीवर "बुलडोझर" फिरणार असेल करोडो रुपयाची संपत्ती हातातून जाणार असेल तर "जगण्यापेक्षा मरण बरे" वाटते .हा नकाशा तयार करण्यासाठी नगरपंचायतमधील अधिकारी व पदाधिकारी यांनी ठराव करून सह्या केल्या कि काय असे वाटते.
नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्धी केलेल्या नकाशामुळे नातेपुते नगरीमध्ये भयानक स्मशान शांतता पसरली आहे, यापुढे हा नकाशा रद्द करण्यात यावा यासाठी शेती धारक, प्लॉट धारक, सामाजिक कार्यकर्ते यांनी सह्याची मोहीम राबवून आवाज उठवणे गरजेचे आहे.
तसेच प्रारूप विकास आराखडा तयार करण्याअगोदर ज्या गट नंबर धारकांचे व प्लॉट धारकांचे क्षेत्र जाणार आहे त्या बाबत गाव पातळीवर बैठक नगरपंचायतच्या अधिकारी यांनी बोलावली पाहिजे, मते जाणून घेतली पाहिजेत, तसेच प्रारूप विकास आराखडाबाबत जनजागृती केली पाहिजे, प्रसिद्ध केलेला विकास आराखडा नकाशा नगरपंचायत मुख्य दरवाजा समोर लावला गेला पाहिजे, तो आड बगलेला लावला नाही पाहिजे.
प्रसिद्ध केलेला नकाशा लावल्यानंतर अधिकारी यांनी शिक्का व सही करून तारीख टाकून हरकतीसाठी अर्ज मागवले पाहिजेत, हरकतीसाठी ३० ते ६० दिवसांचा शासकीय कालावधी असतो तो पत्रकानुसार त्याची माहिती दिली पाहिजे. शेती धारक, प्लॉट धारक यांना अंधारात ठेऊन प्रारूप विकास आराखडा अधिकारी व पदाधिकारी यांनी ठराव करून करणे हे योग्य नाही.
तसेच खोडसाळपणाने मुद्दाम नकाशा प्रसिद्ध केलेला चिटकावून मागील तारीख टाकून ८ ते १० दिवस राहतील, त्यामुळे हरकती ग्रामस्थांना घेणे अवघड होईल असे कटकारस्थान रचून ग्रामस्थांना गाफिल ठेऊन प्रारूप विकास आराखडा कसा मंजूर करता येईल हा उद्देश असतो.
अर्जदारांना अर्ज देताना तारीख संपली, अर्ज घेतले जाणार नाहीत असे अधिकारी सांगतात. त्यांना हरकतीपासून दूर ठेवले जाते. त्या वेळेला लेखी ग्रामस्थांनी अर्ज घेत नसल्या बाबत मागणी करावी, तसेच तुम्हास सरकारी कामात अडथळा या कायद्याचा आधार घेऊन अधिकारी तुमच्यावर दबाव टाकतील, त्या वेळीस अधिकारी यांच्यावरती ग्रामस्थांनी दफ्तर दिरंगाई कायदा याचा आधार घ्यावा.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.