नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या अनुषंगाने टाकलेल्या आरक्षणाबाबत नगरवासीयांकडून आलेल्या हरकतींचा नगरवासीय व लोकप्रतिनिधी या सर्वांसमोर तोडगा काढावा. यामागणीचे निवेदन कल्याण जाधव सहा. संचालक नगररचना, सोलापूर यांना शिवसेना नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी राजकुमार हिवरकर-पाटील यांनी दिले.
नातेपुते नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रारूप विकास आराखड्याचे आरक्षण टाकल्यामुळे काही कुटुंब भूमिहीन होणार आहेत. काही ठिकाणी ३० मीटर, १५ मीटर चे रस्ते हे नागरी वस्ती मधूनच नकाशात प्रसारित केले गेले आहेत. पिढी जात कसत असलेल्या जमिनी यावरती फॉरेस्ट, ग्रामपंचायत काळापासून केलेली घरे, बांधकामे, दवाखाने यावरती विकास नगररचनेच्या नकाशात दाखवलेले रस्ते यासह विविध प्रयोजने यामुळे नागरिकांच्या उदरनिर्वाहाच्या जागा, घरे, शेतजमिनी असलेली बांधकामे यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या अनुषंगाने ११० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. नातेपुते नगरपंचायतीच्या हद्दीतील जवळपास २६ गटांचा आरक्षणाशी संबंध येत आहे.
याबाबत नातेपुते नगरपंचायतीने केलेले ठराव सुद्धा नागरिकांना माहित नाहीत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपंचायतीला विकासासाठी भरपूर निधी दिला आहे. विकासाच्या कामाबरोबरच नागरिकांच्या उदरनिर्वाहाच्या जागा, घरे, जमिनीच्या प्रश्नाबाबत नोंदविलेल्या हरकतीवर सुनावणी घ्यावी. सुनावणीस स्वतः उपस्थित राहून नगरवासीय व लोकप्रतिनिधी यांच्यासमोर तोडगा काढावा अशा मागणीचे निवेदन दिले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.