उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
माळशिरस तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका यांचा भव्यदिव्य असा मान-सन्मान शिवसेना नेते राजकुमार हिवरकर-पाटील यांच्याकडून माळशिरस पंचायत समिती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सभागृहात करण्यात आला.
यावेळी माळशिरस पंचायत समितीच्या महिला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती आसमा आतार मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्रामधून माळशिरस तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीने आमचा सन्मान करणे हा बहुतेक पहिलाच कार्यक्रम असावा, त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा दाखवून आमचा मान सन्मान करण्यासाठी ते इथपर्यंत आले आणि आमचा मान सन्मान केला त्याबद्दल नेहमीच आम्ही त्यांचे आभारी असू. तसेच त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रामधून माळशिरस तालुक्यातील आपला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पहिला सबमिट झाला असे गौरवउद्गार काढले.
यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी त्यांचे मत व्यक्त करताना सांगितले की, आम्हाला मदतनीस तसेच सेविका हे रात्रीच्या बारा वाजले, रात्रीच्या दोन वाजले आणि पहाटेचे चार वाजले तरी आम्हाला कॉल करत होते आणि आम्ही कधीही त्यांचा कॉल घेतला नाही असं झालं नाही. आम्ही पूर्ण वेळ त्यांना सहकार्य केलं आणि आम्ही जास्तीत जास्त फॉर्म कसे भरले जातील आणि आपल्या गरिबातल्या गरीब लाडक्या बहिणीला कशी मदत पोहोच करता येईल यासाठी आम्ही भरभरून अशी मदत त्यांना केली. त्याचेच फळ म्हणून श्री.राजकुमार हिवरकर-पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्यावतीने आमच्यासाठी ते सन्मानपत्र तसेच साडी दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही नेहमी आभारी आहोत. तसेच सेविका यांनी फॉर्म भरताना सुरुवातीला ज्या काही अडचणी निर्माण झाल्या त्या सांगितल्या तसेच त्यावर त्यांनी काम केलं आणि फॉर्म सबमिट केला याचे त्यांनी मनोगत व्यक्त केलं.
यानंतर शिवसेना नेते राजकुमार हिवरकर-पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कल्पना महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार साहेब आणि महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आदिती ताई तटकरे यांनी खूप यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या नवदुर्गा अवतार असलेल्या, कुटुंबाला खंबीरपणे चालवणाऱ्या माझ्या माता-भगिनी यासाठी चालू केली आणि ती यशस्वीपणे चालू आहे. ही योजना तुमच्यामुळेच खरोखर ज्या गरीब महिला आहेत, जे गरीब कुटुंब आहेत त्यांना फार मोठी आर्थिक मदत आपल्यामुळे मिळत आहे, मिळाली आहे. आज माझं मन भरून आला आहे की, माळशिरस तालुक्यामध्ये आपल्या अंगणवाडी सेविका तसेच पर्यवेक्षिका मदतनीस आणि आपल्या प्रकल्प अधिकारी अस्मा आतार मॅडम यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे आपण माळशिरस तालुक्यामधून १ लाख २३ हजार ४४८ फॉर्म भरू शकलो. तसेच माळशिरसमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण प्रत्येक महिलेच्या खात्यात साडेसात हजार रुपये प्रमाणे जवळपास 920 लक्ष रुपये आपण माळशिरस तालुक्यासाठी तुमच्या मदतीने आले असे गौरवोद्गार काढले. तसेच ज्यांनी सगळ्यात जास्त फॉर्म भरले त्यांचाही आदर सन्मान हिवरकर-पाटील यांनी केला. तसेच एक फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकाला ५० रुपये ही मदत शासनाने ठरवले आहे, तीही लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. त्यानंतर नेत्यांनी स्वतः प्रत्येक महिलेस, अंगणवाडी सेविका मदतनीस, पर्यवेक्षकांना एक साडी, गुलाबाचे फुल आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ तालुका व्यवस्थापक श्री.रणजीत शेंडे साहेब यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हिवरकर-पाटील यांच्यामुळेच माळशिरस तालुक्यामध्ये रेशन दुकानासाठी आपण २६ अर्ज केले होते त्यापैकी २१ अर्ज मंजूर होऊन माळशिरस तालुक्यातील २१ बचत गटांना त्यांच स्वतःचं रेशन दुकान चालू करण्याची संधी मिळाली.
यावेळी प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध उद्योगपती बबन शेठ रुपनवर, भाजपाचे मनोज जाधव, भाजपाचे तेजस गोरे, सोशल मीडियाचे सुनीलजी बनकर तसेच जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रियाज शेख तसेच आरोग्य सेविका मदतनीस पर्यवेक्षिका अधिकारी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.