संपादक: अभिमन्यू बी. आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)
माहिती अधिकारातून उघड झालेली धक्कादायक परिस्थिती व पुरावे हाती लागले असून ही भयानक बाब समोर आली आहे.
मी ग्रामपंचायत तसेच नगरपंचायतकडे केलेल्या ठरावाच्या प्रति मागितल्या त्यामध्ये ग्रामपंचायतकडून ठरावावर पदाधिकारी यांच्या सह्या नसलेले, त्या ठरावावर फक्त सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या असून अनुमोदक, सूचक यांच्या सह्या नसल्याचे ठराव हाती लागले आहेत. तर मासिक मिटिंगमध्ये हजर असलेले सदस्य त्यांची नावे व सह्या ठरावर नसल्याचे पुरावे संपादक यांच्या हाती लागले आहेत.
तसेच नगरपंचायतकडील ठरावाच्या प्रति संपादक यांच्या हाती लागल्या असून त्या ठरावर फक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सदस्य, सभापती बांधकाम समिती व सूचक म्हणून प्रशासकीय अशी नावे दिसून येत आहेत. ठरावावर फक्त मुख्याधिकारी व नगराध्यक्ष व नगरपंचायतचा शिक्का दिसत आहे. त्यामध्ये ठराव करताना हजर असलेले नगरसेवक व त्यांच्या नावांच्या सह्या दिसत नाहीत. त्यामुळे नक्की हा ठराव खोटा कि खरा?, चुकीचा की बरोबर? कि वरिष्ठ अधिकारी यांची दिशाभूल करणारा ठराव आहे कि काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये गोंधळ व संशय येत आहे.
तसेच ठरावावर ग्रामपंचायत व नगरपंचायत व इतर पालिकांमध्ये अशीच परिस्थिती आहे कि काय? असे वाटते. एखाद्या व्यक्ती संदर्भात किंवा गावाचा आराखडा करताना ग्रामपंचायत स्थरावावर ठरावावर मासिक मिटिंग घेतेवेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांची नावे व सह्या असणे कायदेशीर असू शकते. संपादक म्हणून काही ग्रामपंचायत व नगरपंचायतचे ठराव हाती लागले त्यावेळी मासिक मिटिंग विकास आराखडा करताना फक्त मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्या सह्या असतात. हजर असलेले नगरसेवक यांची नावे व सह्या नसल्याचे ठराव हाती लागलेले आहेत. त्यामुळे हे ठराव विश्वास दर्शक असू शकत आहेत का? असा प्रश्न उभा राहतो. काही ठराव हे बदनामी, तर काही जातीवादी ठरवू शकतात मग हे केलेले ठराव सर्वानुमते मंजूर कसे काय म्हणू शकतो.
कोणताही ठराव मंजूर करताना ग्रामपंचायत असो वा पालिका सर्व पदाधिकारी यांनी सह्या केलेले ठराव असले पाहिजेत. ज्यावेळी ठराव एखाद्या व्यक्ती बाबत अगर इतर विकास याबाबत केला तर पदाधिकारी यांच्या सह्या असणे कायदेशीर असू शकते. असे आढळून आले कि, ग्रामपंचायत स्थरावर व नगरपंचायत स्थरावर जे ठराव केले ते अधिकारी जनतेची दिशाभूल करणारे आहेत. हाती लागलेले ठराव पुरावे म्हणून मिळाले आहेत.
एखाद्याच्या विरोधात ठराव केलेले दिसले. सदस्य वा नगरसेवक यांनी ठरावावर सह्या का केल्या असे विचारले तर सदस्य किंवा नगरसेवक म्हणतात आम्ही सह्याच केल्या नाहीत. त्यामुळे वाद निर्माण होतो असे दिसून आल्यामुळे हे रोखठोक जनहितार्थ म्हणून लिहावे लागले.
मी बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचा संस्थापक म्हणून व बहुजन भूषण वृत्तपत्र, बहुजन मित्र वृत्तपत्राचा संपादक म्हणून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सर्व पदाधिकारी यांच्या सह्या असलेले ठरावच ग्राह्य धरावेत यासाठी पाठपुरावा करणार.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.