Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

ब्रिटीशकालीन शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करा: भीमराव फुले

उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण)

     सरकार बदलते, शासन निर्णय बदलतात परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्यावतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन, शेतकर्‍यांच्या समस्या समजुन घेत प्रशासकीय, न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले असुन शेतरस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चळवळीच्या वतीने जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरीचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत. समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा, चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा. शेरस्त्याअभावी नापिक राहणाऱ्या भूधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्या, प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा, शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतस्ते करा, शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी, विभाजन शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. 

     शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व पेरणी अंतर्मशागत कापणी, मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीपुरक व्यवसाय, सर्पदंश, विज पडणे, पुर येणे, आग लागणे यास्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके, त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारमाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आणत वेळोवेळी निवेदने, आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या संदर्भात सोलापुर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी, शेत तिथे रस्ता व तहसीलवर शुन्य शेतरस्ता केस ठेवाव्यात. अन्यथा सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयावर दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते भीमराव फुले यांनी म्हटले आहेत. 

     महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या असुन भावाभावात, शेतकऱ्यांमध्ये शेत रस्त्यांच्या कारणामुळे आपापसात मोठे वाद निर्माण झाले असुन भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली असुन शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्‍याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे व राज्यसमन्वयक दादासाहेब जंगले यांनी सांगितले.

ग्रामसमृद्धीसाठी शेवटच्या शेतकऱ्याला शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार अरुल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले व शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुक्याचे भीमराव फुले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी सोलापुर जिल्हयातील चळवळीचे प्रमुख भिमराव फुले, संयज स्वामी, नागू चांडगे, मुरलिधर सावंत, हरिदास थिटे, अरुण ढगे, नागनाथ पाटील, यशवंत फडतरे, माऊली दडस, सावंत आदी शेतकरी उपस्थित होते.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...