संपादक: (बहुजन भूषण वृत्तपत्र)
नातेपुते पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीवरून
जमिनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणावरून माळशिरस सत्र न्यायालयाने तिघा भावंडांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, नातेपुते पोलीस ठाणे येथे दिनांक २०-१०-२०२१ रोजी फिर्याद दिली.
फिर्यादी बापू नाना वाघमोडे रा.फोंडशिरस, फुले मळा, तालुका-माळशिरस, येथे जमीन गट नंबर १४१३ जमीन आहे. सदर सामाईक जागेवरून फिर्यादीचे वडील नाना अण्णा वाघमोडे, वय-७० वर्ष यांचेबरोबर भावकीतले १.किरण महादेव वाघमोडे वय १९ वर्षे, २.अंकुश महादेव वाघमोडे वय २७ वर्ष, ३.धर्मेंद्र महादेव वाघमोडे वय ३५ वर्षे यांनी संगणमत करून वडील नाना अण्णा वाघमोडे यांना लोखंडी पाईप ने डोकीत मारून तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले म्हणून वैगरे मजकुराची फिर्यादवरून नातेपुते पोलीस ठाणे येथे गु.र.नंबर ३६५/२०२१ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३०२, ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर हे करीत होते. सदर दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर यांचे मार्गदर्शनाखाली दप्तरी सहाय्यक पोलीस फौजदार अनिल गडदे यांनी काम केले. तसेच तपासाचे दरम्यान आरोपी विरुद्ध सबळ असा पुरावा हस्तगत करून सदर आरोपीविरुद्ध माननीय सत्र न्यायालय माळशिरस येथे दोषारोप पत्र दाखल केले होते माननीय सेशन कोर्ट न्यायाधीश श्री.एल.डी हुली, सत्र न्यायालय यांनी सदर गुन्ह्याचे ट्रायल चालवून सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना दोषी धरून दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी न्यायालयाने i) भा.द.वि कलम ३०२ अन्वये दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी ५००० रुपये दंड, ii)दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास, iii)तसेच ५०४, ५०६, ३४ मध्ये १ वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठाण्यात आली आहे, अशी शिक्षा सुनावली आहे. सदर केससाठी पुण्यातील सबळ पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन उत्कृष्टपणे कर्तव्य पार पाडलेले आहे. सरकारी वकील एस.एस.पाटील, कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घाडगे, पोलीस नाईक मारुती शिंदे यांनी काम पाहिले आहे.
सदरची कामगिरी माननीय डी.वाय.एस.पी. शिरगावकर साहेब, प्रभारी अधिकारी सपोनी महारुद्र परजणे, तत्कालीन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल गडदे, मा.सरकारी वकील एस.एस.पाटील साहेब, कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घाडगे, पोलीस हवालदार/ मारुती शिंदे यांनी केली आहे..!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.