संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
हाती लागलेल्या पुराव्यानुसार "जे दिसले, जे हाती लागले, तेच मांडले" नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. निवडणूक झाली, उमेदवार नगरसेवक झाले, नगराध्यक्ष्, उपनगराध्यक्ष झाले, नगरपंचायतला मुख्याधिकारी मिळाले. नातेपुते नगरीचा विकास होईल, भरमसाठ निधी येईल, जनतेच्या हिताच्यादृष्टीने विकास योजना राबविले जातील, जनतेला सोयी-सुविधा मिळतील अशा अपेक्षा मतदार जनतेला होत्या.
महाराष्ट्र शासनाचा विकास आराखड्याबाबत नातेपुते नगरपंचायतकडे परिपत्रक आले होते. त्यानुसार शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांची बैठक घेऊन माहिती जनते समोर मांडली पाहिजे होती. असे न करता शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांना अंधारात ठेऊन कोणत्याही प्रकारची माहिती जनतेपर्यंत पोहचू दिली नाही. मतदार जनतेला गाफिल ठेऊन सर्व नगरसेवक यांनी ठरावास सहमती देऊन शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांचा विश्वासघात केला. त्याच्या जागेवरती, जमिनीवरती आरक्षण पाडून शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांना उध्वस्त करण्याचा डाव खेळला आहे. सर्व नगरसेवक यांनी ठरावास सहमती दिल्यामुळे मुख्याधिकारी यांनी सूचक म्हणून वरिष्ठ कार्यलयाकडे पाठपुरावा केला. नगरसेवक यांनी विरोध केला असता तर प्रारूप विकास आराखडा झालाच नसता. यामध्ये मुख्याधिकारी यांना दोष देता कामा नये, याला कारणीभूत सर्व नगरसेवक ठरले आहेत.
तसेच या मागे राजकीय दबाव सरळ दिसून येतोय. यामध्ये राजकीय मंडळींचे घरे, जमीन, असे काहीही गेले नाही असे जनतेतून बोलले जात आहे. ज्या नगरसेवक यांनी रहिवाशी यांची घरे पाडून शेतीवर आरक्षण टाकून प्लॉट धारक, शेती धारक, ग्रामस्थ यांना देशोधडीला लावण्यासाठी ठराव मंजूर केला त्यात नगरसेवक यांनी चूक केली. ज्या शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांनी मतदारांनी निवडुन देऊन नगरसेवक केले, त्याच मतदारांचा नगरसेवक यांनी विश्वासघात केला, ही शोकांतिका आहे. ठराव मंजूर करून नगरसेवक यांनी शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांचे वाटोळे केले. (पद आज आहे ,उद्या नाही) हे लक्षात घेतले पाहिजे होते.
यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या नगरसेवक यांचे करायचे काय? मतदार बंधुनो तुम्हीच ठरवा, लोक चळवळ उभी करावी लागेल, उपोषण, गावाबंद, मतदानावर बहिष्कार अशी आंदोलने प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यासाठी आवाज उठवावा लागेल. जागृत रहावे लागेल, करोडो रुपयेच्या जागा, जमिनी, इमारतीची विल्हेवाट लागणार आहे. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
तसेच शिवसेना नेते तथा विश्वस्थ दाते प्रशाला नातेपुते मा.राजकुमार-हिवरकर पाटील यांनी कोणताही शेतकरी, प्लॉट धारक, ग्रामस्थ उध्वस्त हौऊ नये यासाठी शासकीय दरबारी रीतसर आपली बाजू जनतेसाठी मांडत आहेत, त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
तसेच नगरसेवक यांनी प्रारूप विकास आराखडा यासाठी ठराव केला असला तर तो ठराव रद्द करता येतो, त्यासाठी सर्व नगरसेवक यांनी मानसिकता दाखवली पाहिजे इतकेच.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.