मा.आ.ना.श्री.जयकुमार (भाऊ) गोरे, महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, सोलापूर जिल्हा पालकमंत्री |
सोलापूर जिल्ह्याला मा.जयकुमार गोरे यांच्या रूपाने पालकमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे जनतेला आपला माणूस आहे, जनतेशी शासन दरबारी न होणारी कामे मा.पालकमंत्री यांच्यामदतीने होतील असे जनतेला वाटत आहे.
ग्रामविकास मंत्री असल्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधील कामे मार्गी लागणार. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधील अधिकारी, कर्मचारी हे (गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत) जनतेने दिलेल्या अर्जाची दखल घेत नाहीत, टाळाटाळ करतात, कोणालाही घाबरत नाहीत असे चित्र दिसत आहे. पण आता ग्रामविकास मंत्री ते सोलापूर जिल्हा पालकमंत्री मा.जयकुमार (भाऊ)गोरे साहेब आहेत. अधिकारी व कर्मचारी यांना वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत, आता अधिकारी, कर्मचारी यांना दिवसा चांदण्या दाखवतील. अधिकारी, कर्मचारी यांना आलेला माज जिरवतील. मा.जयकुमार गोरे साहेब हे एक उत्तम जनतेसाठी काम करणारे नेतृत्व मानले जाते.
मा.जयकुमार गोरे साहेब यांनी माण खटाव या दुष्काळ भागाचे नंदनवन केले आहे. रस्ते, पाणी या योजना राबवून तालुक्याचा विकास केला आहे. सोलापूर जिल्हा यामध्ये प्रचंड बागायती, जिरायती शेती असून त्या मानाने पाणी ही आहे. सोलापूर जिल्ह्यात राजकारण हे हेवे-दावे असे आहे, मनमानी कारभार आहे, त्यामुळे जनतेच्या अडीअडचणी सुटत नाहीत, न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न जनतेसमोर उभा होता. यापूर्वीही कितीतरी पालकमंत्री झाले पण ते फक्त राजकारणी लोकांचे हित पाहणारे व जनतेला वाऱ्यावर सोडणारे, जनतेला वाली सोलापूर जिल्ह्यात नव्हता. ग्रामपंचायतपासून पंचायत समिती ते जिल्हा परिषद यामधील कामे राजकीय दबावाखाली जनतेची होत नव्हती असे चित्र आहे.
अधिकारी, कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी हजर नसतात, जनतेला उल्लू बनवितात, राजकीय दबावामुळे जनतेला विकासाच्या योजना मिळत नाहीत ही या सोलापूर जिल्ह्याची शोकांतिका आहे. मा.जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री सोलापूर जिल्हा आपण जनतेसाठी अशेचे किरण ठराल ही जनतेची अपेक्षा आहे.
भाऊ नक्कीच ग्रामपंचायत ते पंचायत समिती ते जिल्हा परिषद यामधील जनतेची कामे होणेसाठी अधिकारी, कर्मचारी यांना आदेश देतील. भाऊ यांच्यारूपाने सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री, तर महाराष्ट्र राज्याला ग्रामविकास मंत्री लाभले आहेत त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.