Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना कर्मचारी प्रलंबित मागण्यांबाबत मा.ना.जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना वाखरी, ता.पंढरपूर, जि. सोलापूर येथे निवेदन

संपादक (बहुजन भूषण वृत्तपत्र) 

     राज्यात २७ हजार १२० ग्रामपंचायतीमध्ये लिपीक, पाणी पुरवठा, दिवाबत्ती कर्मचारी, शिपाई सफाई कामगार अशा विविध पदावर अतिशय कमी वेतनात काम करीत आहेत. 

     हे कर्मचारी गावातील नागरीकांना लोकोपयोगी सेवा निरंतर पुरविण्याचे काम करीत असलेल्या ६० हजार ग्रामपंचायत कर्मचा-यांचे विविध प्रश्न व मागण्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत आहेत.

     ग्रामपंचायत कर्मचा-यांना उद‌योग उर्जा व कामगार विभागाने निश्चीत केलेले १४१२५/- ते ११६२५/- रुपये सुधारीत किमान वेतन दर लागु असुन शासनाकडून वसुलीच्या प्रमाणात सदर कर्मचा-यांचा किमान वेतनावरील खर्च भागविण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न व लोकसंख्या व परीमंडळ निहाय कुशल अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीनुसार शासनाकडुन ५०, ७५ व १०० टक्के वेतन ग्रामपंचायत कर्मचा-यांना मिळत आहे. उर्वरीत ५० व २५ टक्के वेतन ग्रामपंचायतीने अदा करायचे असुन सदर वेतन ग्रामपंचायतीकडुन वसुली नसल्याचे कारण सांगितले जाते. 

     या किमान वेतनाव्यतिरीक्त रहाणीमान भत्ता विशेष भत्ता अदा करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे परंतु सद्यस्थीतीत जुलै २०२४ पासून सदर कर्मचा-यांचे वेतन ऑफलाईन पध्दतीने मिळत असल्याने सदर वेतन कर्मचा-यांना वेळेत मिळत नाही. 

     त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचा-यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे असे अनेक प्रश्न व प्रलंबीत मागण्या खालील प्रमाणे आहेत.

१) ग्रामपंचायत कर्मचा-यांना नगरपरीषद, जिल्हापरीषद कर्मचा-याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी.

२) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६१ वगळण्यात यावे.

३) ग्रामपंचायत कर्मचा-यांना उपदान, व निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे.

४) ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनासाठी लावण्यात आलेली जाचक वसुलीची अट रद्द करुन सरसकट १००% वेतन मिळावे.

५) ग्रामपंचायत कर्मचा-यांची प्रा. फंडाची रक्कम भविष्य निर्वाह निधी संघटन ईपीएफ कार्यालयाकडे वर्ग करण्यात यावी.

६) ग्रामपंचायत कर्मचा-यांचा आकृतीबंध सुधारीत करावा.

७) ग्रामपंचायत कर्मचारी नोकर भरती १०% आरक्षणानुसार अनुकंपा भरतीच्या धर्तीवर करण्यात यावी.

अशा प्रकारच्या मागणीचे पत्र  मा. ना.जयकुमार भाऊ गोरे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना देण्यात आले.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...