Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

नातेपुते नगरपंचायतचा विकास आराखडा म्हणजे शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी यांना उध्वस्त करण्याचा कुटील डाव: मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले


संपादक: बहुजन भूषण वृत्तपत्र 

नातेपुते नगरपंचायतचा जा.क्र.०६/२०२४ दिनांक १०-१०-२०२४ या ठरावाची नक्कल माहिती अधिकारातून मिळवली आहे. त्या ठरावात 1) नगराध्यक्ष सभापती स्थायी समिती, २) उपनगराध्यक्ष सभापती नियोजन व विकास समिती ३) सदस्य सभापती बांधकाम समिती ४) सूचक प्रशासकीय असे असून ठराव सर्वानुमते बहुमताने मंजूर केला गेला. 

तसेच ठराव जा.क्र.०६/२०२४ दिनांक २६-११-२०२४ ठरावाची नक्कल हाती लागली, त्या ठरावात सर्वसाधारण सभा ३०-०८-२०२४, विषय नंबर १७, ठराव क्र.७८३ असा असून १) नगराध्यक्ष सभापती स्थायी समिती २) उपनगराध्यक्ष सभापती नियोजन व विकास समिती सदस्य, ३) सभापती बांधकाम समिती ४) सूचक प्रशासकीय ठराव सर्वानुमते बहुमताने मंजूर ठरावावर मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांच्या सह्या असून नगरपंचायतचा शिक्का आहे, असे ठराव संपादक या नात्याने माहिती अधिकारातून मिळवले आहेत. त्यावरती नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सदस्य, मुख्याधिकारी असा उल्लेख आहे. 

त्यात एक सदस्य की, सर्व सदस्य येतात की नाही असे वाटते. ठराव हा नातेपुते गावाच्या ग्रामस्थांच्या हिताच्यादृष्टीने सर्वांना माहिती देऊन, आमसभा घेऊन, शेती धारक, प्लॉट धारक, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली पाहिजे होती. ग्रामस्थांना अंधारात ठेऊन विकास आराखडा करून शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ यांना उध्वस्त करण्याचा डाव, कटकारस्थान रचून नातेपुते हे गाव स्मशान गाव म्हणून नाव लावायचे आहे कि काय? असा प्रश्न पडतो आहे. 

ठराव करताना सर्व नगरसेवक यांच्या नावासह सह्या असे कायदेशीर समजले जाईल असे वाटते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सदस्य व मुख्याधिकारी हेच सर्वस्वी आहेत कि काय? यामध्ये एक सदस्य की अनेक सदस्य हे मात्र कळणे अवघड जागेचे दुखणे म्हणावे लागेल. नातेपुते नगरी ही शंभु महादेवाची नगरी आहे, येथेच हिशोब चुकता करावा लागतो. नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ यांना उध्वस्त करण्यासाठीच केले असा संशय, खात्री वाटू लागले. 

यामध्ये शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ या विकास आराखडामुळे बरबाद तर काहींचे जीवन संपणार आहे. यामध्ये काही मिठाचे खड्डे असतील ते नाकारू शकत नाही. नातेपुते नगरपंचायतने केलेला उध्वस्थ आराखडा रद्द केला पाहिजे. सर्व नगरसेवक यांनी हा विकास आराखडा रद्द करण्यासाठी मानसिकता ठेवली पाहिजे. तसेच सर्व शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ यांनी लढा उभा करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. 

तसेच नातेपुते विकास आराखडा रद्द होण्यासाठी शिवसेना नेते तसेच दाते प्रशाला विश्वस्त मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील हे झटत आहेत. हा नातेपुते नगरपंचायतने विकासभिमुक ठराव करताना उध्वस्थ हेच स्वप्न सर्व नगरसेवक यांनी बाळगले होते कि काय? नातेपुते हे गाव या विकास आराखडामुळे चिंतेत आहे, कोमात गेले आहे मात्र सर्व नगरसेवक शांत आहेत, आनंदी आहेत असे चित्र आहे, कारण निकृष्ठ दर्जाची कामे करून शासकीय निधी हडप केलेला दिसतोय, तर काही नगरसेवक यांच्या घरापर्यंत रस्ते या विकास निधीतून केलेले मी संपादक म्हणून पाहत आहे. त्यामुळे काही नगरसेवक बोलु शकत नाहीत असेही चित्र आहे. 

सर्व शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे इतकेच...!

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...