उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)
दि.१४/०१/२०२५ रोजी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात महर्षीच्या जयंतीनिमित्त क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमच्या अध्यक्षा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्सा मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील उपस्थित होत्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत असताना त्यांनी सांगितले कि, माळशिरस तालुक्याच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य करून माळशिरस या माळरानाचे नंदनवन केले व सर्व संस्थांची सहकारतत्वावर उभारणी केली. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा लोकनेते प्रतापसिंह मोहित-पाटील यांनी चालविला आहे व आज डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील हे त्यांच्या विचारांचा वारसा अखंडितपणे पुढे चालवीत आहेत.
या प्रसंगी वक्ते प्रा.शहाजी पारसे यांनी सहकार महर्षीच्या जीवन कार्याचा परिचय करून देताना सांगितले की, महर्षी काकांच्या वक्तृत्व, नेत्तृत्व व कर्तुत्व या प्रभावीगुणामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी व प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून राहिले. महर्षीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यावर असल्यामुळेच त्यांनी संपूर्ण आयुष्यभर शेतकरी, कष्टक व वंचित उपेक्षित घटकाला केंद्रबिंदू मानून जातीपाती विरहित समाजकारण व राजकारण केले आहे.
प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांनी उपस्थित सर्व पाहुणे व पत्रकार बंधूचे स्वागत केले. तसेच आपल्या प्रास्ताविकात महविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेऊन महर्षीच्या कार्याचा थोडक्यात परिचय देऊन लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील व महाविद्यालायचे मार्गदर्शक संचालक डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्तुत्वाचा थोडक्यात परिचय करून दिला.
या प्रसंगी कार्यक्रमच्या अध्यक्षा मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याहस्ते उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला.
तसेच सोलापुर विद्यापीठाची पी.एच.डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.रज्जाक शेख, डॉ.डी.एम. साळवे तसेच एम.ए. भूगोलशास्त्र विभागातील गोल्ड मेडल धारक विद्यार्थी श्री.अजय कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आभार प्रा.सुहास नलवडे व सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र खंदारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.