उपसंपादक : वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)
यावेळी मुलांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या. नवीन वर्षाचे औचित्य साधून स्कूलमध्ये फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समाजसुधारक, पत्रकार, राजकारणी, देशभक्त शेतकरी, वकील, वासुदेव, तिरुपती बालाजी, छत्रपती शिवाजी महाराज तसेच विविध राज्यातील वेशभूषा परिधान करून मुलांनी नवीन वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले.
पारंपारिक आणि वेस्टर्न पोशाख विद्यार्थी आणि शिक्षकांनी परिधान करून मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचेही स्वागत केले. तसेच भाषण करून महापुरुषांच्या स्मृतीस अभिवादन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू आठवले, श्रीकांत बाविस्कर, मनोज राऊत उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अँड.शिवशंकर पांढरे, चेअरमन सौ.तेजस्विनी पांढरे, सदस्य सुजाता मुंजी आणि इन्चार्ज प्रीती हिंगणे इत्यादी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अँड.शिवशंकर पांढरे यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडत मुलांना मोबाईल पासून दूर करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी ढोपे आणि वैशाली पालवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्योती बंडगर, रागिनी जाधव,कोमल रणदिवे, शैला ठोंबरे आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.