उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांच्या पक्ष, सामाजिक संघटना यामधील जे पदवीधर बांधव असतील व त्यांची नावे पदवीधर यादीमध्ये असतील, त्या पदवीधर बंधू-भगिनींनो आपले लाखमोलाचे पवित्र पहिल्या पसंतीचे मत देऊन बहुमताने विजयी करा.
मी अभिमन्यु आठवले, अपक्ष उमेदवार आहे. मी संपादक, पत्रकार म्हणून रोखठोक व निर्भीड पत्रकारिता अनेक वर्षे करीत आहे. माझ्या अनेक वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव पदवीधर बांधवांच्या आयुष्यात त्यांच्या शिक्षणाचा फायदा करून देण्यासाठी वापरायचा आहे. शिक्षण वाया जाता कामा नये, त्यासाठी तुमचे मत तुमच्यासाठी आशेचे किरण असणार आहे.
आज मी आपल्यासमोर केवळ एक उमेदवार म्हणून उभा नाही, तर पदवीधरांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आवाज उठविण्याची भूमिका घेऊन आलो असून आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आपण सर्वांनी शिक्षण घेतले, पदवी मिळवली आणि आपल्या कुटुंबाच्या अशा अनेक अपेक्षा मनात घेऊन जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजचे पदवीधर अपुऱ्या रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षा, महागाई, दुष्काळ, आर्थिक अडचणी आणि विविध प्रशासकीय प्रश्नांना सामोरे जात आहेत. मी या प्रश्नांकडे केवळ निवडणुकीपुरते पाहण्याची माझी भूमिका नाही.
आपण मला लाखमोलाचे पवित्र मत देऊन विधान परिषदेवर पाठवणे गरजेचे आहे. आपल्या मताचे ऋण मी आयुष्यभर जपेन. पदवीधरांच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत ठामपणे मांडणे, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रश्न सुटेपर्यंत प्रयत्न करणे, ही माझी जबाबदारी असणारच! माझ्यासाठी तुमचे मत म्हणजे केवळ मतदानाच्या दिवशी केवळ एक मतांचा ठसा नाही; ती माझ्यावर सोपविलेली जबाबदारी आहे, विश्वास आहे आणि पदवीधरांच्या भविष्यासाठी दिलेले वरदान आहे!
म्हणून पदवीधर बंधू-भगिनींनो,
एकदा लाखमोलाचे पवित्र मत विश्वासाने द्या, एकदा मला संधी द्या. तुम्ही दिलेल्या मताची परतफेड पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्की करणारच! आपल्या प्रश्नासाठी लढणाऱ्या माझ्यासारख्या उमेदवाराला विधान परिषदेत पाठवा, तुमचा आवाज माझा आवाज असेल आणि तुमचा प्रश्न माझा प्रश्न असेल. पदवीधरांना "वापरा आणि फेकून द्या" अशी माझी भूमिका कधीच राहणार नाही. निवडणूक संपल्यानंतर मी तुमच्या सुख-दुःखामध्ये आणि प्रश्नांमध्ये तुमच्यासोबत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारच!
आपल्या एका मतातून माझी उमेदवारी बळकट होईल, पण त्यापेक्षा मोठे बळ मिळेल ते पदवीधरांच्या हक्कासाठी लढण्याचे. पदवीधर बंधू-भगिनींनो, मतपत्रिकेतील नाव वाचून माझ्या नावापुढे पसंती क्रमांक १ असा लिहून आशीर्वाद द्या.
मी अभिमन्यु भानुदास आठवले, माझा अनुक्रमांक १४ आहे. माझे नाव वाचून माझ्या नावापुढे '१' पहिल्या पसंतीचे मत देऊन बहुमताने विजयी करावे, ही नम्र विनंती."
"वार शुक्रवार, दिनांक २३/१०/२०२६ रोजी सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वा. पर्यंत मतदान आहे.
आपला जिवाभावाचा उमेदवार,
अभिमन्यु भानुदास आठवले
(अपक्ष उमेदवार पुणे पदवीधर मतदार संघ )
.jpg)
