उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण
वृत्तपत्र
आपण निवडून दिलेल्या कोणत्याही कालावधी मधील महाराष्ट्र सरकार यांनी पोलिस भरती असो वा कोणत्याही विभागाची भरती असो ती रद्द अथवा स्थगित
करू नये. युवकांच्या जीवाशी खेळू नये. युवक शासनाच्या नियमांनुसार परीक्षा फी भरत आहेत.
जी स्पर्धा परीक्षा/भरती असते त्यासाठी अभ्यास करतात. त्यासाठी लागणार्या नियमांनुसार
तरुण त्यासाठी मेहनत, कष्ट घेत असतात. नोकरी लागेल
म्हणून रात्रंदिवस काळजी करत असतात. आई, वडिलांच्या घामाचे चीज
करावे अशी महत्वकांक्षा असते. त्या आशेवर युवक भरतीसाठी कष्ट घेत असतो. कोणतीही भरती
रद्द झाल्यास अगर स्थगित केल्यास भरलेली फी युवकांना परत दिली जात नाही ही गंभीर व
चिंताजनक बाब आहे. स्थगिती किंवा भरती रद्द का करतात? असे होणार
असेल तर भरती करण्यापूर्वी सरकार का विचार करत नाही असे वाटते. भरती करीत असताना स्थगित
करणे किंवा रद्द केल्यास युवकांनी एकजुटीने एकत्र येवून कोणतेही महाराष्ट्र सरकार असो परत अशा
सरकारला मतदान करू नये असे वाटते. युवक हा देशाचा अभिमान आहे. त्या युवकाला भरतीचे
आमिष दावायचे आणि कोणतेतरी कारण पुढे करून त्या भरत्या रद्द करायच्या ते चुकीचे आहे.
सरकारने डोके ठिकाणावर ठेवून ज्या भरत्या करायच्या आहेत त्या कराव्यात जेणेकरून युवकांना
रोजगार मिळेल. भरत्या रद्द किंवा स्थगित केल्यास त्या युवकांचे वर्ष वाया जाते, वय वाढते त्यामुळे तो शिकला सवरला तरुण बेकार होतो त्यांची अवस्था गंभीर होते.
तरी कोणत्याही विभागाची भरती करीत असताना ती रद्द किंवा स्थगित करू नये व सरकारने डोके
ठिकाणावर ठेवावे. तरुणांच्या जीवाशी खेळू नये असे डॉ.अभिमन्यु. बी. आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे
केले आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.