उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
सध्या राज्यकर्ते पिसाळलेले असून त्यांनी
प्रचंड संपत्ती गोळा केली असून त्या संपत्तीचा त्यांना “माज” चढला आहे. मतदार राज्यांनी
मतदान करून राज्यकर्ते बनविले तेच राज्यकर्ते सध्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब
आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व इत्यादी समाजसुधारक यांच्याबाबत
अवमानकारक भाषा वापरुन त्यांचा अपमान करीत आहेत हे चिंताजनक व गंभीर अशी बाब आहे. राज्यकर्ते
झाले म्हणून समाजसुधारकांना वाईट समजू लागले आहेत. राज्यकर्त्यांनो तुमची लायकी काय? तुम्ही समाजसुधारकांची बरोबरी तुमच्या हजार पिढ्या जरी आल्या तरी तुमची बरोबरी
होणार नाही. जे राज्यकर्ते महान समाजसुधारक यांच्यावरती जे अवमानकारक बोलून त्यांचा
अवमान करीत आहेत, जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करीत आहेत, शांततेचा भंग करीत आहेत अशा राज्यकर्त्यांना घराबाहेर पडू देता कामा नये व
त्यांना व त्यांच्या पार्टीला जनतेने मतदान करू नये.
जे राज्यकर्ते सध्या “वाचाळवीर” ठरत आहेत
त्या औलादींना जनतेने धडा शिकविला पाहिजे. सध्या राज्यकर्त्यांनी हुकूमशाही चालू केली
आहे, दहशतीचे वातावरण पसरविले आहे जेणेकरून वादविवाद व्हावेत, भांडणतंटे व्हावेत, एकमेकाविषयी समाजा-समाजामध्ये दूषित
वातावरण व्हावे यासाठी राज्यकर्त्यांकडून समाजसुधारकांचा अवमान चालू आहे. राज्यकर्त्यांना
समाजसुधारक “लहान” वाटत आहेत पण ते लहान नसून “महान” आहेत. राज्यकर्त्यांनी स्वत:ची
पात्रता तपासावी, विनाकारण समाजसुधारकांवरती बोलून प्रसिद्धीमध्ये
राहण्याचे स्वप्न बघू नये व ते कधीच साकार होणार नाही हे “भाडखाऊ” राज्यकर्त्यांनी
लक्षात घ्यावे. समाजसुधारक यांचे महान कार्य असून त्यांना कमी लेखता कामा नये. त्यांची
तुलना तुमच्याशी कधीही होणार नाही हे “हरामखोर” राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.
जे पेराल तेच उगवले जाणार आहे हे राज्यकर्त्यांनी
लक्षात घ्यावे. पदाचा दुरुपयोग करू नये, राज्यकर्त्यांनी
खोट्या तक्रारी करून मजबूत कलमे लावून कार्यकर्त्याचे आयुष्य बरबाद करण्याचे कटकारस्थान
चालू केले आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड मधील घटना. आमचे भिमसैनिक
लढणारे आहेत, रडणारे नाहीत, जोर का झटका
देणारे आहेत. राज्यकर्त्यांनो महान समाजसुधारकांचा अवमान होईल असे वागू नये, सावधगिरी बाळगावी. समाजसुधारकांचा अवमान करणार्या राज्यकर्त्या भडव्यांचा
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु बी. आठवले यांच्याकडून जाहीर
निषेध.
तसेच 1 जानेवारी भीमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादन
दिवस आहे. या दिवशी लाखो भिमसैनिक आपल्या कुटुंबासमवेत भिमाकोरेगाव येथे विजयीस्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात. सध्या वातावरण चिघळे आहे यामुळे भिमसैनिकांनी गाफिल राहू नये. “झेंडा लहान
पण दांडा मोठा” असायला हवा. काही समाजकंठकांना पाठबळ देवून काही जातिवादी पार्टीचे
नेते वातावरण गढूळ करण्यासाठी कट रचतील असे वाटते. भिमसैनिक बांधवांनो सावधान रहावे
व नम्रपणाने, शांततेने भीमकोरेगाव येथे जाऊन अभिवादन
करावे. तसेच आमचा बाप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागू नका, लाचारी पत्करू नका. शिका, संघटित
व्हा, संघर्ष करा, सुटाबुटात रहा, स्वाभिमानी व्हा असे सांगणारे आमचे बाप होते. जय भिम
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.