नातेपुते येथील वारकरी सांप्रादयाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करताना मान्यवर |
संपादक
नातेपुते ता.माळशिरस येथील विठ्ठल मंदिरात
वारकरी सांप्रादयाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा शाल,
पेन, गुलाबफूल, मास्क व अल्पोहार देवून सन्मानित करण्यात
आले. यावेळी पत्रकार दिनानिमित्त बोलताना श्री.विनायक उराडे म्हणाले की,
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. पत्रकारामुळे आजूबाजूला घडणार्या घटनांची माहिती
जनतेपर्यत पोहोचते. त्याच प्रमाणे पत्रकारांवर जाणूनबुजून कोणी अन्याय केला तर पत्रकाराच्या
बाजूने आमचा वारकरी सांप्रादाय भक्कमपणे उभा राहील. यावेळी वारकरी सांप्रादयातील मान्यवर
चंद्रकांत ठोंबरे (माजी ग्रा.प.सदस्य), विजयदादा उराडे,
जगन्नाथ सोनवळ, विनायक उराडे (सामाजिक कार्यकर्ते),
तुकारामभाऊ ठोंबरे, संजयमामा उराडे, अभिजीत महामुने,
अनंता सोनवळ यांनी पत्रकारांचा सन्मान केला. यावेळी पत्रकार श्री.लतीफ नदाफ,
सुनीलदादा राऊत, श्रीकांत बावीस्कर, आनंद लोंढे सर,
आनंद जाधव, विलास भोसले, मनोज राऊत, प्रमोद शिंदे,
उमेश पोतदार, भगत महाराज, अभिमन्यू आठवले पत्रकार उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.