मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) |
संपादक
राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब यांनी घरदाराचा, रक्तातील कुटुंबाचा त्याग करून आयुष्यभर “ब्रम्हचारी” राहून भारत देशातील जनतेचा सेवक बनून “जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून कर्तव्य बजावत आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतुचा सामना करून जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यात मिळून मिसळून राहत आहेत. साहेबांकडे मीपणा नाही. जनता आणि कार्यकर्ते हाच माझा परिवार समजून काम करीत आहेत. साहेबांनी मिळालेले आयुष्य हे जनतेसाठीच वाहिले आहे. घरादाराचा, रक्तातील नात्याचा विचार न करता घर सोडले, लग्न केले नाही हा साहेबांचा त्याग आदर्शवादी ठरत आहे. केवळ जनता आणि कार्यकर्ते हेच माझे कुटुंब असे समजून कर्तव्य बजावत आहेत. साहेब स्वत:च्या पक्षाचे संस्थापक आमदार ते नामदार झाले परंतु जनतेपासून व कार्यकर्त्यांपासून आलिप्त होऊ शकले नाहीत. पद मिळाले म्हणून गर्व बाळगला नाही. मंत्रीपदामुळे जनतेला व कार्यकर्त्यांना वार्यावर सोडले नाही. पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते हीच माझी “दौलत” आहे. “निष्ठा आणि कर्तव्य” हे साहेबांचे गुण अतिमौल्यवान ठरत आहेत. साहेबांची असलेली माणुसकी जनतेला आपुलकीची वाटत आहे. महादेवरावजी जानकर साहेब म्हणजे आपला माणूस अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पक्ष चालवीत असताना कार्यकर्ते नाराज होणार नाहीत याची साहेब काळजी घेत आहेत. राष्ट्रीय समाजपक्ष हा सर्वधर्म समभाव असा हा पक्ष आहे. यामध्ये जात,पात, धर्म नाही. त्याचप्रमाणे साहेबांकडे कसलाही स्वार्थपणा नाही. करायचे ते जनतेसाठी, कार्यकर्त्यासाठी हीच अपेक्षा ठेवून आपलेपणा जपत आहेत. घरदार, रक्तनाते सोडून आयुष्यभर ब्रम्हचारी राहून जनता आणि कुटुंब हेच नात समजून साहेब येईल तो दिवस आनंदाने घालवीत आहेत. “केवढा मोठा साहेबांचा त्याग” नको संपत्ति, नको सोनेचांदी, पैसा असे साहेबांचे मत असावे. मिळालेले जीवन हे इतरांसाठी असावे. त्यामध्येच मोठा आनंद आहे असेच कदाचित साहेबांचे मत असावे. साहेबांची अखंड अविरत जनसेवा सुरू आहे. रंजल्या गांजल्यांना साहेबांचा आधार वाटत आहे. साहेबांनी घरदार, रक्तातील नात यांचा जो त्याग केला त्याची किंमतच होऊ शकत नाही. याबाबत जेवढे साहेबांचे कौतुक करावे तेवढे अपुरे पडेल. साहेबांवरती रोगराई आपत्तीचे संकट आले तरी जनतेचा आशीर्वाद त्यांना असल्यामुळे कोणतेही संकट साहेबांच्या आजूबाजूला फिरकणार नाही असे वाटते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.