Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतच्या निवडणुका व १९ जानेवारी २०२२ रोजी लागलेल्या निकालानंतर विजय झालेले सर्व उमेदवार व “झुंज” दिलेले उमेदवार व पॅनेल प्रमुखांचे अभिनंदन...!



संपादक

नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२२ यामध्ये पार पडलेल्या निवडणुका व १९ जानेवारी २०२२ रोजी लागलेल्या निवडणुकीचा निकाल यामध्ये जे उमेदवार, बंधु-भगिनी विजयी झालेल्या आहेत त्यांचे अभिनंदन...! तसेच “झुंज” देणार्‍या उमेदवाराचे तसेच पॅनेल प्रमुखांचेही अभिनंदन...! तसेच माळशिरस व महाळूंग, श्रीपूर तसेच महाराष्ट्रातील नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या व निकालही लागले. त्यामध्ये सर्व विजयी व झुंज देणार्‍या उमेदवाराचे व पॅनेल प्रमुखांचे अभिनंदन...! यापुढे नगरपंचायतमध्ये नगरसेवक” म्हणून जात असताना विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून मतभेद बाजूला सारून एकजुटीने गावाचा, प्रभागाचा, विकास करण्यासाठी कटिबद्ध राहावे. शासकीय निधीतून उत्कृष्ट विविध योजना राबवा. गोरगरिबाचे अतिक्रमणे करण्यासाठी ठराव करा. जे घरकुल योजनेपासून जे वंचित आहेत त्यांना आयुष्याचा आधार करा. त्यांच्यासाठी प्रकाशमय व्हा. कोणी मतदान केले, कोणी नाही असे मनात आणू नका. सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असे समजून काम करा. कोणत्याही मतदार बांधवांना कमी लेखू नका. जय-पराजय असतो त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करा, राग येवू देवू नका, डोक शांत ठेवा, तोंडात साखर ठेवा. प्रत्येक मतदार बांधव भगिनी आपल्या आहेत या दृष्टीने वागा यामध्ये तुमचे कौतुक आहे तुम्हास मान सन्मान मिळेल. जे विजयी झालेले आहेत व जे पराभूत झालेले आहेत सर्वांचे अभिनंदन...! आता लक्ष फक्त नगराध्यक्ष कोण होणार, कोणाला संधी मिळणार हेच मतदार बांधव, भगिनी यांचे लक्ष लागून राहिले आहे. निकालावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच त्या त्या नगरपंचायत मधील सर्व कर्मचारी सर्व मतदार बंधु भगिनी, सर्व पत्रकार. या काळात आप आपल्या परीने कर्तव्य दक्ष राहिले त्यांचेही अभिनंदन...! इतकेच.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...