संपादक
कोणत्याही क्षेत्रातील निवडणुका असु दया त्यासाठी निवडून येण्यासाठी पैसा महत्वाचा ठरू शकत आहे. पैशापुढे मतदार लाचार झाला आहे. आपल्या पवित्र मताची किंमत पैशात मोजली जाते. राजकारणाचा खरा “किंगमेकर” पैसा आहे. पैशापुढे कोणताही उमेदवार डॉक्टर, वकील, इंजिनीअर, कोणत्याही शाखेचा पदवीधर, उच्च विचार सरणीचा मनमिळावू, अभ्यासूवृत्तीचा उमेदवार रिंगणात उभे असतील तर त्यांना मतदार किंमत देत नाही. परंतु ७ वी शिक्षण असलेले, जनतेशी संबंध कधीही नसलेले उमेदवार पैशाच्या जोरावरती निवडून येतात ही गंभीर बाब आहे. “लोकशाही” कागदपत्रापुरती राहिली आहे. सध्या लोकशाहीच “चांगभलं” झाल आहे. लोकशाहीला आर्थिकशाही घातक ठरत आहे. यापुढे सर्वसामान्य, उच्चशिक्षित उमेदवार जनतेला चालतील असे वाटत नाही. घमेंड खोर, गुंड, पैसेवाला, तस्कर असेच लोक मतदार निवडून देणार कारण त्यांचा पैसा घेतला जातो. पैशापुढे मतदार राजा बेशरम, दुबळा झाला आहे. मतदान यंत्राला दोष देण्यात अर्थ नाही. दोषी मतदान यंत्र नाही तर मतदार हे दोषी आहेत. राजकारण म्हणजे घराणेशाहीसाठी “वरदान” ठरले आहे. घराणेसाही रक्तपिपासो असले तरी मतदार घराणेशाहीच्या तालावर नाचत आहे. घराणेशाहीने मतदारांना “गुलाम” बनवले आहे असे सध्याचे चित्र आहे. राजकारण हे माणुसकीचे राहिले नसून पैसेवालेचे झाले आहे मला संपादक म्हणून वाटते. राजकारण हे समाजकारण यापुढी होईल असे वाटत नाही. सध्या राज्यकर्त्यांचे राजकारण हे पदवी बनले आहे. राजकारण म्हणजे “पैसा फेको तमाशा देखो” असे झाले आहे. पैसेवाल्यांनी मतदारांना कमकुवत बनविले आहे. पैशापुढे मतदार हे “माकड” झाले आहे. मतदारांनी पैसे घेतल्यामुळे निवडून आलेल्या उमेदवाराकडे आमचे काम करा म्हणून पुढे जाण्याची त्यांची हिम्मत होत नसते त्यामुळे ५ वर्षे त्या उमेदवाराचे आनंदाचे जात असतात. त्यांना मतदारांची कामे करण्यासाठी किंवा वार्डाचा, प्रभागाचा विकास करण्यासाठी टेंशन नसते. फक्त शासकीय योजनाची नावे पुढे करून निवडून आलेले सर्वजण मिळून मिसळून शासकीय निधी “हडप” करण्याचा त्यांचा हेतु असतो. उमेदवारांना मतदाराचे काही देणेघेणे नसते कारण त्यांनी निवडून येण्यासाठी मतदारांना पैसा दिलेला असतो. निवडणुकीत घातलेला पैसा वसूल करण्यासाठी तो उमेदवार सतत झटत असतो. इतकेच
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.