संपादक
एसटी लाल परी ही जनतेची नाडी असून जनतेच्या
सेवेसाठी अहोरात्र धावत असते. त्यामध्ये चालक व वाहक यांची कर्तव्यनिष्ठा अत्यंत महत्वाची
असते. दररोज एसटी महामंडळाला चालक व वाहक हजारो रुपये कमवून देत असतात. चालक व वाहक एक रुपयाचा
सुद्धा भ्रष्टाचार करीत नाहीत. पारदर्शी व स्वच्छ अशी नोकरी करतात. सर्व क्षेत्रातील
नोकरदारांना भरमसाठ पगार शासन देते, आयोग लागू केला जातो. त्यांना
विविध सवलती दिल्या जातात परंतु एसटी महामंडळाच्या लालपरीच्या कर्मचार्यांना मात्र तुटपुंज्या
पगारात निवृत्त होईपर्यंत काम करावे लागत आहे. एसटीचा नोकरदार यांची परिस्थिति अत्यंत
बिकट दयनीय अशी पाहावयास मिळत आहे. लालपरीचा
चालक व वाहक स्वत:वर जबाबदारी घेवून दिवसरात्र “जनतेची सेवा व सरकारला मेवा”
कमवून देत आहेत. असे असताना त्यांना मात्र कमी पगारात आयुष्य काढावे लागते. एसटी महामंडळाच्या
कर्मचार्याची परिस्थिति सुधारली आहे असे दिसत नाही. लालपरीचा चालक व वाहक यांची नोकरी
म्हणजे “एक चाक कुटुंबावर व एक चाक रस्त्यावर” असते. कामावर गेलेला आपला माणूस परत
येईल की नाही हे सांगता येत नाही अशी परिस्थिति असते. सध्या एसटी महामंडळाच्या कर्मचारी
यांनी संप पुकारला आहे तो हक्कासाठी, न्यायासाठी आहे. संप करणे गैर नाही. प्रत्येकाला
संविधानाने अधिकार दिलेला आहे. जे चालक व वाहक दररोज शासनाला हजारो रुपये कमवून देतात.
सर्व चालक वाहक या राज्याला दररोज कोट्यवधी रुपये मिळवून देतात त्यांना मात्र शासन
वंचित ठेवत आहे. सर्व क्षेत्रापैकी काम करणारा एकमेव विभाग व महामंडळ म्हणजे लालपरीचा
एसटी महामंडळ व प्रामाणिक त्याचे चालक व वाहक हेच खरे कर्मचारी आहेत. त्यांचा संप हा
त्यांच्या हक्कासाठी आहे. त्यांच्या मागण्याही रास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्या
महाराष्ट्र शासनाने मान्य करून संप मागे घेण्यास सांगावे. एसटी महामंडळाच्या कर्मचारी
बांधवांनो मिळालेले जीवन उध्वस्त करू नका. आत्महत्या करणे म्हणजे तुमच्या कुटुंबावर
फार मोठा आघात आहे तुम्ही घरातील कर्ता माणूस आहात. तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे.
आत्महत्याने प्रश्न सुटणार नाहीत हे लक्षात घ्यावे. महाराष्ट्र सरकारने त्वरित या कर्मचार्यांच्या
मागण्या मान्य करून त्यांना त्यांचा हक्क द्यावा. एसटी महामंडळाच्या कर्मचार्यावरती
“कशी नसीबाने थट्टा आज मांडली” अशी म्हणण्याची वेळ येवू
देवू नये. महाराष्ट्र शासनाने या प्रामाणिक कर्मचार्याचे हित पहावे. सर्व क्षेत्रातील
कर्मचार्यापेक्षा या जबाबदार कर्मचार्यांना भरपूर पगार दिला जावा असे वाटते.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.