सध्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार जनतेच्या मतामुळे निवडून गेले त्यांना आपल्या तालुक्याचा व तालुक्यातील जनतेचा विसर पडला आहे असे दिसते. मतदारांना वार्यावरती सोडले आहे, आमदारांनी आपल्या मतदार संघात आमसभा घेवून जनतेच्या असलेल्या अडीअडचणी याबाबत अर्ज, निवेदन घेवून चर्चा करून सोडविण्यासाठी आमदारांनी आमसभा घेतली पाहिजे. ज्या तालुक्यातून आमदार झाले त्या तालुक्यात आमदार आमसभा घेताना दिसत नाहीत ही चिंताजनक व खेदजनक गंभीर बाब आहे. आमदारांनी आमसभा घेणे बंधनकारक आहे. तसेच काही आमदार स्टंट करण्यात पटाईत आहेत. मत मागताना निवडणुकीच्या दरम्यान आमदार होण्यासाठी प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जात होते. परंतु निवडून आलेवर कोण मतदार, कोणता तालुका? याचा विसर पडला. आमदारांना आमसभा घेण्यास अॅलर्जी आली आहे असे कदाचित दिसते. आमसभा घेणेही जनतेसाठी हिताचे असते.
आमदारांनी आमसभा घेतल्याचे शासकीय दरबारी कागदोपत्री दाखविले जाते की काय? असे वाटते. आमसभा न घेणार्या आमदाराविषयी जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे व त्या आमदारावर जनता उदासीन आहे. केवळ आमदार निधीतून योजनेची नावे सांगून आमदाराचे स्टंट करणे महाराष्ट्रात चालू आहे असे पाहायला मिळत आहे. आमदारांनी आपआपल्या तालुक्यात आमसभा प्रसिद्धीद्वारे करून घेतली पाहिजे. न घेणार्या आमदारांना कारणे दाखवा नोटिसाद्वारे कळविण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकारी यांना असतो. जसे ग्रामपंचायत ग्रामसभा न घेणार्या सरपंच, ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई होते त्याच धर्तीवर आमसभा न घेणार्या आमदारावर कारवाई होऊ शकते. काही ठिकाणी आमदार जनता दरबार या अंतर्गत नौटंकी करून दरबार भरवत आहेत असेही दिसते.
आमसभा तालुक्यातील जनतेसाठी एक परिषद, चर्चा, अडचणी, विकासात्मक गाव पातळीवरील प्रश्न यावरती असतात. त्यानुसार आमदारांनी त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा यासाठी आमसभा असते व आमसभा ही जनतेचे हित समजून कर्तव्य म्हणून घ्यावी लागते. जे आमदार तालुक्यात आमसभा घेत नाहीत, टाळाटाळ करतात त्यांची पुढील वाटचाल जनता थांबवेल अशी परिस्थिती दिसते. "आमदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा” असे काही तालुक्यात परिस्थिती आहे.
सध्या मतदारांना उच्च शिक्षित
डॉक्टर, इंजिनिअर, वकील असे उमेदवार चालत
नाहीत परंतु पैसे घेवून पवित्र मत देवून पात्रताहीन उमेदवार निवडून देतात ही
शोकांतिका आहे. पैसे देवून मत देणार्या जनतेसाठी कशासाठी आमसभा घ्यायची असे
आमदारांना वाटत असल्यामुळे ते आमसभा घेत नाहीत असे वाटते. परंतु आमसभा आमदारांनी
घेणे तालुक्याच्या जनतेसाठी महत्वाचे ठरते असे असताना आमदारांना आमसभा घेण्याची
अॅलर्जी आहे असे दिसते असे प्रसिद्धीद्वारे
मा.श्री.अभिमन्यु बी. आठवले यांनी केले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.