उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर नातेपुते पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या प्रेस नोट वरून एका व्यक्तीचा गळा चिरून खून केला असून त्यास धर्मपुरी ता.माळशिरस येथे नीरा उजव्या कॅनॉलमध्ये टाकून देण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पाण्यात टाकला. त्या मृत व्यक्तीचे नाव संतोष सोमा घोडके वय अंदाजे ३५ ते ४० रा.सलगर नगर वस्ती, डोणगाव रोड सोलापूर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ते तपासात उघड झाले आहे. रविवार दिनांक २२/०१/२०२३ रोजी धर्मपुरी येथील नीरा उजवा पाण्याच्या कॅनॉल मध्ये लोखंडी पाईपला अडकलेला मृतदेह आढळून आला. याबाबत नातेपुते पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर गळ्यावर कापलेली अशी जखम आढळून आली असा अहवाल वैद्यकीय अधिकारी यांनी दिला. यानंतर पोलिसांनी मयताची ओळख पटविली. मयताची पत्नी मीनाक्षी संतोष घोडके लक्ष्मीनगर, हात्तुरे, ता. जि. सोलापूर ओळख पटल्यानंतर वाढीव कलमे लावून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलिस अधिक्षक साहेब सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलिस अधिक्षक साहेब, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास नातेपुते पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे हे करीत आहेत.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
: मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक
: बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.