संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
ग्रामसभा ही लोकशाहीतील सर्वोच्च व्यवस्था
आहे. २६ जानेवारी १९५० रोजी या भारत देशात पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्यामुळे
या देशात प्रजेची सत्ता आली. आम्ही सर्व भारतीय नागरिक म्हणून वावरू लागलो. या दिनामुळे
लोकशाही आली, स्वातंत्र्य आले. ग्रामसभा ही सार्वभौम
आहे. ग्रामसभेला निवडणूक नाही, गावातील प्रत्येक व्यक्ति ग्रामसभेचा
सदस्य असतो. ग्रामसभा ही विधानसभा, लोकसभा यांची “जननी” आहे.
ग्रामसभेला काही अधिकार देण्यात आले असले तरी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी कोणत्याही जाती धर्माच्या विषयी
खोटी दिशाभूल करणारी चुकीची माहिती ग्रामसभेमध्ये मांडू नये व मांडले व ग्रामसभेतील
ग्रामस्थांनी त्या सुचनेला सहमती दाखवली व खोटा ठराव केला त्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अनुमोदक, सूचक व साह्य करणारे जे ग्रामस्थ त्यांचेवरती
संघमताने कट रचून त्या कुटुंबाची नाहक बदनामी जाणूनबुजून करण्याच्या हेतूने केलेल्या
ठरावानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली तर त्यांचे सदस्यत्व रद्द होण्यास
कारण ठरते.
तसेच जे कुटुंब अनुसूचीत जाती जमातीमध्ये
मोडत असेल आणि त्या कुटुंबाची बदनामी ग्रामसभेच्या दिवशी केली गेली असेल तर त्यांचेवरती
गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच एखाद्या जाती धर्मातील कुटुंबाचा प्रश्न
असेल तर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष बैठक घेवून चर्चा करून मार्ग काढावा. ग्रामसभेत
जनतेचा विकास त्याचबरोबर गावामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठाकडे
त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव महत्वपूर्ण ठरू शकतो. ग्रामसभेत खोटे
ठराव करणे हा ग्रामसभेचा अपमान समजला जातो. कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्ति असोत
त्यांची बदनामी व्हावी हा दृष्टीकोन ठेवून खोटा, चुकीचा
दिशाभूल करणारा ठराव करणे हे चुकीचे ठरते. सरपंच, उपसरपंच, सदस्य हा पाच वर्षासाठी असतो तो कायमस्वरूपी नसतो.
तसेच ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा सचिव
तो नियंत्रण अधिकारी म्हणून असतो. परंतु ग्रामपंचायतचा पदाधिकारी झाला म्हणून हुकुमशाही
करू शकत नाही याचे भान पदाधिकारी यांनी ठेवणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात अतिक्रमण
हा विषय गंभीर बाब बनत आहे त्यामुळे वाद-विवाद वाढत आहेत, जातिवाद वाढत आहेत याला कारण म्हणजे जातिवादी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व गावातील
पात्रताहीन काही मोजक्या व्यक्ति असू शकतात. हा वाद एक ठिणगी म्हणून त्या पदाधिकारी
यांना महागात पडते.
ग्रामपंचायत मधील कारभारी स्वच्छ नसतात.
भ्रष्टाचारी व्यक्ति म्हणून त्यांची कामगिरी असू शकते. ग्रामसभेमध्ये एखाद्या जाती
धर्माच्या व्यक्तीला टार्गेट करणे गुन्हा आहे. तसेच ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकांनी केलेली
कामे, त्यासाठी आलेला निधि, सरपंच, ग्रामसेवक
यांनी चेक द्वारे काढलेली रक्कम, मंजूरी पत्रके, कोणी कामे केले, शासकीय योजनांची माहिती याबाबत ग्रामसेवकांनी
माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच ग्रामसभेचे चित्रीकरण करण्यात आले पाहिजे.
सर्व स्तरावर २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक
दिना दिवशी भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे फोटो ठेवून पुजा
करून ध्वजारोहण करण्यात यावे. सर्व भारतीय बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा...!
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
: मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक
: बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.