![]() |
समता इंग्लिश मेडियम स्कूल नातेपुते या स्नेहसंमेलना निमित्त आपले विचार व्यक्त करताना माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते |
उपसंपादक - बहुजन भूषण वृत्तपत्र
सालाबादप्रमाणे समता इंग्लिश मेडियम स्कूल नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन २३/०१/२०२३ ते २६/०१/२०२३ रोजी पार पडले. यावेळी या शाळेतील विद्यार्थी यांनी चालू घडामोडीवर उपक्रमाची निर्मिती केलेली प्रात्यक्षिक करून दाखविले. या शाळेची स्थापना करून १५ वर्षे होत आहेत. या शाळेतील विद्यार्थी यांनी स्पर्धेमध्ये तसेच इतर खेळामध्ये यश मिळवून शाळेचे नाव लौकिक केलेले आहे. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे माळशिरस विधानसभेचे आमदार श्री.राम सातपुते व सौ.संस्कृती राम सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले की, ही शाळा माझी आहे. या शाळेला जेवढी मदत लागेल तेवढी करीन, ही शाळा मी दत्तक घेतली असे आश्वासन दिले.
तसेच या शाळेला महिन्यात १० कॉम्पुटर देणार असल्याचे सांगितले. तसेच नातेपुते गावाला विकासासाठी १० कोटी रुपयेचा निधि उपलब्ध करून दिलेला आहे. यावेळी सौ.संस्कृती राम सातपुते यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच यावेळी मान्यवर, तसेच पत्रकार यांचाही पत्रकार दिनानिमित्त आमदार राम सातपुते, संस्थेचे संस्थापक बी.वाय.राऊत, विश्वस्त सुनील राऊत जेष्ठ पत्रकार यांचेवतीने सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थी यांनाही यावेळेस परितोषिक देवून गौरवण्यात आले. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून देशभक्ती वर आधारित, तसेच मराठी गाण्यांवर शाळेतील लहान मुलांनी आपली कला सादर केली.
या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास डॉ.एम.पी.मोरे, उरावणे, नातेपुते नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, प्रशांत सरूडकर सर. (तसेच २३/०१/२०२३ ते २६/०१/२०२३ विविध गुणदर्शन कार्यक्रमानिमित्त) माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, सौ.संस्कृती राम सातपुते, के.के.पाटील सदस्य नियोजन समिति, धनंजय देशमुख शिक्षणाधिकारी पंचायत समिति माळशिरस, माधव खांडेकर मुख्याधिकारी नातेपुते नगरपंचायत, दादासाहेब उराडे, रावसाहेब पांढरे, दीपक काळे, रणजीत पांढरे, माया उराडे, शर्मिला चांगण, सविता बरडकर व इतर नगरसेवक व मान्यवर अर्जुन जठार, नारायण बोराटे व इतर मान्यवर, ग्रामस्थ, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शाळेचे संस्थापक अॅड.बी.वाय राऊत, प्राचार्य वैशाली नायकवाडी, व्हा.चेअरमन नितिन नायकवाडी, सौ.लीलावती बी. राऊत, सेक्रेटरी सुनील राऊत, सौ.सुमित्रादेवी राऊत यांनी सुरू केलेल्या या शाळेची वाटचाल आदर्श ठरत आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
: मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक
: बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.