उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते ता.माळशिरस
जि.सोलापूर येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते रक्ताच्या अध्यावत तपासणी
यंत्राचा लोकार्पण कार्यक्रम नातेपुते ग्रामीण रुग्णालय येथे पार पडला. यावेळी शिवाजी
सावंत म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात रुग्ण
आला असता अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली सेवा देवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण
करावा आरोग्य मंत्री मा.तानाजी सावंत यांनी केलेला संकल्प तडीस नेण्यासाठी सर्वांनी
हातभार लावावा. नातेपुते ग्रामीण रुग्णालयात रक्ताच्या तपासणी यंत्राला त्वरित मंजूरी
देवून उपलब्ध करून दिली. त्यामुळे रक्त तपासण्यासाठी रुग्णांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
तसेच कोरोना काळात आरोग्याचे महत्व कळाले आहे. सर्व सुविधा सर्व सामान्यांना मिळाव्यात
यासाठी आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत झटत आहेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित
या अभियानातून सहा कोटी महिलांची तपासणी केली गेली. रुग्णांना सेवा देण्याचे पवित्र
काम अधिकारी व कर्मचारी यांनी करावे. यावेळी सोलापूर जिल्हा शल्य चिकत्सक अधिकारी धनंजय
पाटील यांनी आरोग्य मंत्री ज्या सेवेबाबत सूचना देतील त्याचे तंतोतंत पालन करण्यात
येईल असे म्हणाले. तसेच राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले, अडचण
निर्माण करू नका, रुग्णांना सेवा देवून मदतीचा हात द्या, रुग्णसेवा बळकट करा. राजकुमार हिवरकर-पाटील यांच्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला
चकाकी आलेली आहे. रुग्णालय स्वच्छ व सुंदर दिसू लागले आहे त्यामुळे राजकुमार हिवरकर-पाटील
यांचे जनतेतुन कौतुक होत आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकत्सक अधिकारी धनंजय पाटील, डॉ.एम.पी.मोरे, शिवसेना (बाळासाहेब) मा.राजकुमार हिवरकर-पाटील
माळशिरस तालुका अध्यक्ष, दत्ता सावंत, शिवाजी
बाबर, महावीर देशमुख, अँड.बी. वाय. राऊत, दीपक खंडागळे, सतीश सपकाळ शिवसेना (बाळासाहेब) उपाध्यक्ष
माळशिरस तालुका, पोपट शिंदे, दादा मुलाणी, संतोष गोरे, डॉ.प्रणव सातव, आरोग्य
सेवक, सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ
यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
: मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक
: बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.