उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण
भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केवळ घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते म्हणून पाहिले जाते पण ते एक संपादक पत्रकार होते. बाबासाहेबांनी 24 नोव्हेंबर 1930 साली जनता नावाचे वृत्तपत्र सुरू केले, ते पाक्षिक होते नंतर ते साप्ताहिक केले. तसेच वृत्तपत्र हे आधुनिक युगाचे, प्रगतीचे, लोकशिक्षणाचे चांगले माध्यम असल्याने त्याद्वारे अश्पृशांच्या हक्काची मागणी मांडता येईल यादृष्टीने बाबांनी 31 जानेवारी 1920 रोजी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केले त्यास 103 वर्षे पूर्ण होत आहेत.
तसेच अश्पृशांची चळवळ भक्कम करण्यासाठी आपले वृत्तपत्र असल्याशिवाय पर्याय नाही असे बाबांना वाटू लागले. त्यामुळे 03 एप्रिल 1927 रोजी "बहिष्कृत भारत" हे वृत्तपत्र सुरू केले. 31 जानेवारी 2023 रोजी मुकनायक वृत्तपत्राच्या वर्धापनदिनाला कोटी कोटी शुभेच्छा...!
या वर्धापन दीनानिमित्त शासकीय, निमशासकीय, समाजाने या मुकनायक वृत्तपत्राच्या 103 व्या दिनानिमित्त आपआपल्यापरीने कार्यक्रम घेवून वर्धापनदिन साजरा करावा.
जनहितार्थ
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.