Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

पत्रकारितेवरती विश्लेषण

 

संपादक : साप्ताहिक बहुजन भूषण

          सध्याच्या काळात पत्रकारिता म्हणजे “नाव मोठे आणि लक्षण खोटे असे झाले आहे.” सध्याच्या काळात पोटजातीमध्ये मोडणारे पत्रकार भरपूर झालेले आहेत त्यामध्ये भटके, भामटे, तोतीया, ब्लॅकमेल करणारे, स्वत:ला अतिशहाणे समजणारे असे पत्रकार मी संपादक म्हणून पाहत आहे. त्याने “पत्रकार होण्याऐवजी त्यांनी पात्रकार व्हावे” असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. परंतु आजच्या काळात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पत्रकार पाहत आहे व तेच इतरांना कमी लेखत आहेत. पत्रकारितेचा धंदा मांडला आहे, पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी सुरू केलेली आहे. जो पत्रकार सत्य वागतो, सत्य लिहतो त्याच्या विरुद्ध षडयंत्र केले जात आहे. दुकानदारी करणारे एकत्र येत असतात आणि सत्यवादी पत्रकाराविरुद्ध मोहीम उघडतात. दोन नंबर धंदे वाल्यास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा पत्रकारांचे जागोजागी पीक वाढले आहे, बिन कामाचे तन वाढले आहे. ज्याला चार ओळीची बातमी नीट लिहता येत नाही. ते स्वत:ला पत्रकार म्हणून मिरवत आहेत. अशा पत्रकारांना जनतेने खडयाप्रमाणे बाजूला ठेवले पाहिजे. जे सत्य लिहतात, अन्याय-अत्याचाराला वाचा फोडतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सध्या असंख्य पत्रकार गळ्यात प्रेस कार्ड अडकावून फिरत असतात त्यामुळे पत्रकार होत नसतो. माध्यम कोणतेही असो त्यामध्ये अभ्यासूपणा महत्वाचा असावा लागतो तर काही पत्रकार घमेंडीत वागत आहेत. आमचे दैनिक, पाक्षिक, साप्ताहिक, मोठे पेपर आहेत. तसेच मोठे चॅनेल हातात असले म्हणजे तो रेपोर्टर मोठा होत नाही त्यामध्ये आपण किती मोठे आहोत हे महत्वाचे आहे. कोणत्या पत्रकारांनी किती बातम्यांना न्याय दिला, कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला यावरती पत्रकारांचे मूल्यमापन ठरते. केवळ पत्रकारितेचा जॉब करणे म्हणजे पत्रकारिता नाही, त्याला हाडाचा पत्रकार व्हावे लागते. जनावराचे हाडे खाऊन कोणी हाडाचा पत्रकार होत नाही. तसेच कोणी वाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नाही. तसेच गळ्यात प्रेस कार्ड अडकावून कोणी पत्रकार होत नसतो किंवा गाडीवर कोणी प्रेस लिहतो म्हणून तो पत्रकार होत नसतो. परंतु हृदयात प्रेस आहे का याचे आत्मपरीक्षण करावे. सध्याच्या काळात पत्रकारिता म्हणजे पैसे कमविणे असे झाले आहे. सध्याच्या काळात मोजक्या पत्रकारांनी धुमाकूळ घातला आहे ते जुन्या पत्रकारांना कमी लेखत आहेत व एकमेकांविषयी तिरस्कार निर्माण करीत आहेत. काही पत्रकार दहशत पसरवून, ब्लॅकमेल करून, सक्ती करून पैसे कमाविण्यासाठी पत्रकारिता करीत आहेत. जनतेने अशा पत्रकारांना चोप दिला पाहिजे. त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल केले गेले पाहिजे. अशा प्रवृत्तीच्या पत्रकारांनी पत्रकारितेची वाट लावली आहे. तसेच कोणत्याही विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी न भीता कोणी त्रास देत असेल, छळ करीत असेल, दमदाटी करीत असेल असा कोण पत्रकार असेल तर त्याचा माज जिरवला पाहिजे. सध्याच्या काळात पत्रकारिता म्हणजे धुणे झाले आहे. पत्रकार म्हणजे जनतेचा खरा लोकसेवक असतो. पत्रकारिता हे कर्तव्य म्हणून केले गेले पाहिजे व चांगला पत्रकार म्हणून नाव कमविले पाहिजे तरच पत्रकाराला जनमाणसात किंमत आहे त्यामुळे पत्रकारिता करीत असताना सत्यघटनेवरती  करावी, कोणालाही मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...