Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

“रोडपती” असणारे व्यक्ति खासदार आमदार झाल्यानंतर पाच वर्षात “करोडपती” कसे होतात याची चौकशी केली गेली पाहिजे : मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले

 

मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी.आठवले
संस्थापक बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य 

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

          लोकसभा, विधानसभा जिंकून ज्या व्यक्ति खासदार आमदार निवडून जातात. निवडणुकीवेळी जे मालमत्तेचे विवरण पत्र भरून दिलेले असते. परंतु ५ वर्षात त्या मालमत्तेमध्ये कितीतरी पटीने त्या मालमत्तेत वाढ होऊन रोडपती असणारे खासदार आमदार करोडपती होतात, एवढी मालमत्ता पाच वर्षात कशी काय त्यांच्याकडे येते? सोने, चांदी, महागड्या गाड्या, जागा इ. संपत्ती येते. खासदार, आमदार झाल्यानंतर संपत्ती भूगर्भातून त्यांचाकडे येते काय? लक्ष्मी प्रसन्न होते काय? अशा खासदार, आमदाराची चौकशी होणे गरजेचे आहे. लोकसेवकच शासकीय निधीत जनतेचा असलेला पैसा यावरती डल्ला मारत असतील तर यांना लोकसेवक म्हणायचे की चोर हा प्रश्न आहे. सरकारी अधिकारी कर्मचारी यांना ५८ वर्षे नोकरी करून ना घर, ना जमीन, ना पैसे, ना सोने चांदी, ना आलीशान गाड्या, ना बंगले ही परिस्थिती आहे. आणि पाच वर्षात खासदार, आमदार प्रचंड संपत्तीचे वारसदार, हक्कदार होतात हा चमत्कार आहे मग भ्रष्टाचारी करणारे कोण? यांची चौकशी कोणता विभाग करणार? यासाठी शासकीय कमिटी असते का? यासाठी प्रश्न उभे राहतात. सध्या मतदार संघात विकास कामासाठी खासदार, आमदार निधीतून करोड रूपयांचा निधि यांच्यानावाने वाटप होतो. मग विकास कामे या निधीतून होतात का? या निधीतून टक्केवारीत अधिकारी, कर्मचारी, खासदार, आमदार साखळी पद्धतीने कागदोपत्री घोडे नाचवून निधि “आपण सगळे भाऊ भाऊ शासकीय निधि वाटून खाऊ तसेच वाट लाऊ” असेच दिसत आहे. खासदार, आमदार यांना पेंशन, मानपान, शासनाच्या सोयीसुविधा, अंगरक्षक म्हणून पोलिस संरक्षण असे असते. “खासदार, आमदारासाठी भगदाड मोकळे आणि मोरीला बोळा” असे चित्र दिसत आहे. सध्या नवीन आमदार करोडो रुपयांचे बंगले बांधून आलीशान गाडीत फिरत आहेत. निवडून जाणारे खासदार, आमदार जोमात आणि मतदार मात्र कोमात असे दिसत आहे. “खा गड्या खा खुशाल खा मिळाली संधी तोवर खा” असेच जनतेने म्हणत बसावे या पलीकडे जनतेच्या हातात काही नाही. खासदार, आमदार झाल्यानंतर प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढीव मालमत्तेचे विवरण पत्र भरून घेतले पाहिजे तसेच सध्या कोणताही आमदार तालुक्यात आम सभा घेताना दिसत नाही ही शोकांतिका आहे असे बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

    

         

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...