उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील गणेश मल्हारी घुले यांनी 26/01/2023 पासून आयडीबीआय बँक शाखा नातेपुते मॅनेजर विरोधात उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. उपोषण सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहेत असे म्हणाले. तसेच बँक मॅनेजर यांनी 10 ते 11 महीने कर्ज प्रकरण मंजूर करण्यास वेळ लावला, माझी दिशाभूल केलेली आहे. मी खादी ग्रामोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडे 25 लाख रुपये व्यवसाय कर्जासाठी अर्ज दिला होता. त्यासाठी ट्रेनिंग हे केले व प्रकरण मंजूर ही झाले, ते प्रकरण नातेपुते आयडीबीआय बँक शाखा नातेपुते यांच्याकडे पाठविले. माझ्या प्रकरणाची दखल घेतली नाही, दिशाभूल केली, दफ्तर दिरंगाई कायद्याचा अवमान केला गेला यामुळे मानसिक त्रास झाला आहे. वेळ व जाण्यायेण्यासाठी पैसाही खर्च झाला आहे. कर्ज प्रकरण त्वरित मंजूर व्हावे यासाठी 11/11/2021 रोजी मुंबई मंत्रालय येथे समक्ष जावून मुख्यमंत्री कार्यालयात माझी व्यथा वेदना मांडली व प्रकरण मंजूर करण्यात यावे असे मी दिलेल्या अर्जावर नमूद केले व मुख्यमंत्री कार्यालयातून मेसेज ही आला परंतु दखल घेतली नाही. बँकेत हेलपाटे मारून काहीही उपयोग झालेला नाही, उलट मला मानसिक त्रास झाला व बँक मॅनेजर ने सांगितले की, कर्जाची फाईल नामंजूर केली आहे. मुख्यमंत्र्याच्या अर्जाला केराची टोपली दाखवली आहे. गणेश घुले म्हणतात की, कर्ज प्रकरण मिळत नसतील तर महामंडळे स्थापन का केली? सध्या सुशिक्षित बेकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बँक मॅनेजर कर्ज प्रकरण मंजूर करीत नाहीत हे शोकांतिका आहे. या उपोषणामुळे गणेश घुले यांची प्रकृती ढासळत चालली आहे. बँक प्रकरण मिळावे म्हणून उपोषण करीत आहेत. उपोषणामुळे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण? महामंडळाकडे जिल्हा उद्योग केंद्र, ग्रामोद्योग याला शासन निधि देते त्याच कार्यालयातून कागदपत्रांची पूर्तता करून घेवून सुशिक्षित बेकारांना कर्ज वाटप केल्यास तरुणांचा प्रश्न सुटेल. त्यामुळे त्यांनी कर्ज मिळावे म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार राम सातपुते माळशिरस विधानसभा, लघु व सूक्ष्म मंत्रालय दिल्ली, जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, पोलिस अधिक्षक ग्रामीण सोलापूर, विभागीय पोलिस अधिकारी अकलुज, खादी ग्रामोद्योग महामंडळ सोलापूर, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील विधानपरिषद, पालकमंत्री सोलापूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नातेपुते पोलिस स्टेशन इ. प्रति माहितीसाठी पाठविल्या आहेत.
बातमी
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.