Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

झटपट पैसे मिळविण्यासाठी "मोह" गुंतवणूकदारांना विश्वासघातकी ठरला, फसवणूक झालेल्या व्यक्तींनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे : मा.श्री.डॉ.बसवराज शिवपूजे, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे गुंतवणूकदारांना आवाहन

 

मा.श्री.डॉ.बसवराज शिवपूजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज, सोबत स.पो.नि. श्री सपांगे नातेपुते पोलीस ठाणे

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

          दिनांक ०३/०१/२०२३ रोजी अकलुज ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे उपविभागीय अधिकारी साहेब मा.डॉ.बसवराज शिवपूजे यांनी अकलुज येथे पत्रकार परिषद घेवून वेदत्री व्हेंचर एल.एल.पी. कंपनी, नातेपुते यामध्ये नातेपुते व परिसरामधील असंख्य गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले आहेत. ज्यांनी कोणामार्फत पैसे गुंतविले गेले आहेत, तसेच कंपनीचे मुख्य संतोष दत्तू गुरव, विजय वसंत क्षीरसागर रा.कोथळे ता.माळशिरस, जि.सोलापूर व सचिन गेनू फुले रा.मोरोची ता.माळशिरस, जि.सोलापूर यांचेकडे पैसे गुंतविलेले आहेत त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे. तक्रार असेल तरच कारवाई करता येते. “कायदा म्हणतो तक्रार द्या तरच कारवाई करता येते.” यामुळे जे कोणी पैशाच्या आमिषाला बळी पडलेले असतील त्यांनी न घाबरता कोणाच्याही दबावाखाली न राहता बिनधास्तपणे तक्रार देण्यासाठी पुढे यावे जेणेकरून न्याय मिळेल व गुंतवणूकदारांचा ज्यांनी केलेला विश्वासघात त्यांना धडा शिकवला जाईल. सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही गुंतवणूकदारांनी भरमसाठ पैसे मिळतील या भोळ्या अपेक्षेने तुमचा विश्वासघात झाला असेल तर तक्रार देण्यासाठी गुंतवणूक केलेल्या व्यक्तींनी पुढे यावे. तसेच आरोपी सतत मोबाईल बदलत होते, सिमकार्ड बदलत होते असे अवघड आव्हान पोलिस कर्मचारी यांच्यापुढे होते परंतु त्यांनी आरोपीचा शोध लावून औरंगाबाद येथे पकडून मुसक्या आवळल्या.

    सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे,

          नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३८७ / २०२२ भा.दं.वि.सं.कलम ४०९, ४२०, सह एम.पी.आय.डी. कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बसवराज शिवपूजे हे करीत आहेत. सदर गुन्हयातील वेदत्री व्हेंचर एल.एल.पी. नातेपुते या कंपनीने गुंतवणुकदारांना आकर्षीत करुन गुंतवणुकदारांची विश्वासाने मोठया प्रमाणात गुंतवणुक केलेल्या रकमेचा परतावा देतो असे सांगुन फिर्यादी तसेच फिर्यादी प्रमाणे इतर साक्षीदारांचे नोटरी कराराप्रमाणे ठेवींची, गुंतवणुक रक्कमेची परतफेड केली नाही व त्यावरील दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तसेच नोटरी कराराप्रमाणे काही परतावा, लाभांश देवुन उर्वरित परतावा, लाभांश व गुंतवणुक केलेली ठेवीची रक्कम न देता फिर्यादी व साक्षीदार यांची एकुण ८६,७०,७९८/ रुपयावी कपटपूर्ण रितीने फसवणुक केली आहे. म्हणुन वेदत्री व्हेंचर कंपनीचे मालक १) संतोष दत्तु गुरव, रा. कोथळे, ता. माळशिरस, २) विजय वसंत क्षिरसागर, रा. कोथळे, ता. माळशिरस, ३) सचिन गेनु फुले, रा. मोरोची, ता. माळशिरस यांचे विरुध्द वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

          सदर गुन्हयाचे तपासादरम्यान यातील आरोपी १) संतोष दत्तु गुरव, रा.कोथळे, ता. माळशिरस, २) विजय वसंत क्षिरसागर, रा.कोथळे, ता. माळशिरस यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी काल दिनांक ०२/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपींना मा.न्यायाधीश अति जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस यांचे समक्ष हजर केले असता त्यांना दिनांक ०७/०१/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.

          यादवारे सोलापुर जिल्हा व इतर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ज्या नागरीकांनी वेदत्री व्हेंचर एल.एल.पी. नातेपुते कंपनीमध्ये गुंतवणुक केली असेल व ज्यांची फसवणुक झालेली असेल अशा गुंतवणुकदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलुज येथे संपर्क साधावा. तसेच या प्रकारच्याआकर्षक लाभ देणाऱ्या स्किमपासून लोकांनी सावध रहावे. कमी वेळेत जास्त नफा असल्या भुलथापांना बळी पडू नये, असा कोणताही प्रकार चालु असेल तर आपल्या नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधावा.

          सदरची कारवाई. मा. शिरीष सरदेशपांडे सो, पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण, मा.श्री हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली व मा.श्री.डॉ.बसवराज शिवपूजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज उपविभाग अकलूज यांचे नेतृत्वाखाली तपास पथकातील स.पो.नि. श्री सपांगे नातेपुते पोलीस ठाणे, पोहेकॉ समाधान देशमुख, पोहेकॉ गणेश निंबाळकर, पोहेकॉ विकी घाडगे, पोना दत्ता खरात, पोना सचिन भोसले, पोकॉ/अजित कडाळे, पोकॉ अन्वर आतार सायबर शाखा यांनी कामगिरी बजावली आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

         

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...