Skip to main content

Posts

Showing posts from 2023

वाखरी येथे यलम्मा देवीच्या यात्रेस सुरुवात

  उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र                          वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे यलम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून भागवात एकादशी दिवशी पालखी पुजारी नारायण मनोहर पोरे यांच्या निवासस्थानापासून देवीच्या मंदिरापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली. वार  रविवार  दि.२४-१२-२०२३ रोजी यलम्मा देवीला नैवद्य दाखविण्याचा कार्यक्रम असतो व वार सोमवार दि.२५-१२-२०२३ रोजी सोमवार या दिवशी पालखी नवसाची आहेर घेण्यासाठी भक्तांच्या घरी जाते. आहेर घेवून आलेनंतर पालखी कुंडाच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी जाते.            त्यानंतर मंदिराजवळ देणगीदारांचा व इतरांचा सहकार्य केल्याबद्दल सन्मान केला जातो. त्यानंतर पुजारी नारायण मनोहर पोरे ,  ज्योतीराम उर्फ परशुराम पोरे इ.   यांचा होमाचा कार्यक्रम असतो. त्या होमातून ते जात असतात. या देवस्थानची स्थापना होऊन १०० वर्षे पूर्ण होत आहे, मंदिर पुर्णपणे दगडी आहे. २४-१२-२०२३...

दलित पँथर संघटनेचे संस्थापक मा.श्री.अंबादास शिंदे सर यांचा थोडक्यात परिचय- मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले (दलित पँथर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष)

मा.श्री.अंबादास शिंदे,  संस्थापक अध्यक्ष  दलित पँथर, महाराष्ट्र राज्य उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नाव: अंबादास सैदू शिंदे, जन्म: ०१-०४-१९४९, जन्म गाव: कुसळंब, ता.बार्शी, जि.सोलापूर, महाराष्ट्र,  शिक्षण: बी.ए. (स्पेशल भूगोल ), बी.एड (भूगोल, इंग्रजी ) सी.सी.जे जर्नालीजम,  नोकरी: सेवा निवृत्त मुख्याध्यापक, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर. भोगलेली पदे: मुख्य संपादक, मालक साप्ताहिक 'बंडखोर' सोलापूर 1985, माजी जिल्हा अध्यक्ष, दलित पॅन्थर सोलापूर (१९७६-७८), माजी अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक निधी समिती सोलापूर, माजी जिल्हा संघटक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी खजिनदार रिपब्लिकन स्टुडंट असोसिएशन, दयानंद कॉलेज सोलापूर, सरचिटणीस शिक्षक कर्मचारी संघटना, माजी सदस्य पशुपक्षी बळी प्रतिबंध समिती सोलापूर, माजी संघटक यंत्रमाग कामगार संघर्ष समिती सोलापूर, माजी फुटबॉल सेक्रेटरी दयानंद कॉलेज, सोलापूर. त्यांची आतापर्यंतची कामगिरी: नामांतर मोर्चा (१०,०००) पँथर्स सोलापूर ते दिल्ली, पँथरचा नंगा मोर्चा, अनेक नामांतर मोर्चा, मशाल मोर्चा, उपोषणे: २१ स...

प्रगल्भ विद्यार्थी विचारमंच, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील समाज गौरव पुरस्कार देऊन मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले यांचा सन्मान

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      दिनांक १७.१२.२०२३ रविवार या दिवशी पंढरपूर येथील जुन्या बस स्टॅन्ड समोरील हॉटेल विठ्ठल इन मध्ये मान्यवरांना पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील समाज गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यामध्ये संपादक अभिमन्यू आठवले साप्ताहिक बहुजन भूषण, बहुजन मित्र यांना पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. आठवले हे आपल्या वृत्तपत्रातून सडेतोड, निर्भीड, जे दिसेल तेच लिहत असतात, त्यांची जहालवादी, मवाळवादी म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे. पुरस्काराचे स्वरूप, भारताचे संविधान, सन्मान पत्र, हार, शाल, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.      पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था काढून गोर-गरिबांच्या मुलाने शिकून मोठे व्हावे, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हि तळमळ होती. त्याच रयत शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय पंढरपूर, पूर्वीचे पंढरपूर कॉलेज पंढरपूर ते आजचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यामध्ये शिक्षण पूर्ण करून पदवीधर झाले. उच्च शिक्षण घेतले आणि या रयत शिक्षण संस्थाचे सं...

दलित पँथरची महाराष्ट्र राज्यात जबरदस्त उभारणी: मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले, दलित पँथर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष

उपसंपादक:  साप्ताहिक  बहुजन भूषण वृत्तपत्र मा.अंबादास शिंदे सर यांनी ३ ऑगस्ट २०२३ रोजी दलित पँथर या संघटनेची स्थापना करून चळवळ गतिमान करण्यासाठी जिल्हा कार्यकारणी, तालूका कार्यकारणी पदाधिकारी नेमून जबरदस्त संघटना उभी केली जात आहे. या संघटनेत असंख्य जाती धर्माचे कार्यकर्ते सामील होत आहेत.  जनतेच्या अडि-अडचणी सोडविण्यासाठी, अन्याला वाचा फोडण्यासाठी हि संघटना जनतेसाठी वरदान ठरणार आहे. या संघटनेचे संस्थापक मा.अंबादास शिंदे सर हे प्रचंड कायद्याचे अभ्यासक आहेत. शासकीय, निमशासकीय दरबारी त्यांचा वचक आहे. हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत मागे हटत नाही., सडेतोड, निर्भीड, रोखठोक, विचारवंत म्हणून त्यांची देश पातळीवर ओळख आहे.  मा.अंबादास शिंदे सरांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट, द ग्रेट सम्राट, मी विद्रोही, अशी अनेक पुस्तके लिहली आहेत. तसेच ते साप्ताहिक बंडखोर या वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार मालक आहेत. त्यांनी असंख्य लोकांना न्याय दिला आहे, माफी मागणे त्यांच्या स्वभावात बसत नाही, कायद्यानुसारच न्याय देण्याचा प्रयत्न असतो, अनधिकृत काम करून देत नाहीत हे मी त्यांच्या सहवासातून अनुभवावरून ल...

दलित पँथरच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी मा.श्री.मनोज राऊत सर तर नातेपुते शहर अध्यक्षपदी सनी श्रीकांत बाविस्कर यांची निवड

उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र दलित पँथर हे नाव देश पातळीवर गाजले आहे. या दलित पँथर संघटनेमुळे न्याय मिळत आहे. या संघटनेचे संस्थापक मा.श्री.अंबादास शिंदे सर आहेत. या संघटनेची स्थापना दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी केली. या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवश्री फत्तेसिंहराजे भोसले असून ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. हि संघटना सर्वधर्म समभाव आहे, अन्याया विरोधी आवाज उठविणारी संघटना म्हणून नाव आहे.  या दलित पँथर या संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी मा.श्री मनोज राऊत सर यांची निवड तर नातेपुते शहर अध्यक्षपदी मा.श्री.सनी श्रीकांत बाविस्कर यांच्यानिवडी संस्थापक अध्यक्ष मा.अंबादास शिंदे सर तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवश्री फत्तेसिंहराजे भोसले यांच्या आदेशानुसार दिनांक १०.१२.२०२३ रविवार या दिवशी नियुक्ती पत्र देऊन सोलापूर जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष मा.श्री.अभिमन्यू आठवले यांनी निवड जाहीर केली.  या निवडी झाल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र चॅनलचे संपादक मा.श्री.प्रमोद शिंदे सर यांनी त्यांच्या कार्यालयात दलित पँथर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्र...

शिवसेना प्रमुख (शिंदे गट) मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील नातेपुते येथील त्यांच्या शिवसेना भवन येथील कार्यालयामध्ये माढा लोकसभा निरीक्षक, माजी आमदार कृष्णा हेगडे साहेब यांच्या भेटीतुन हिवरकर-पाटील यांच्या आदर्श कामगिरीचे कौतुक

उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेना भवन नातेपुते येथे शिवसेनेचे राज्य उपप्रमुख तथा राष्ट्रीय प्रवक्ता सोलापूर जिल्हा, माढा लोकसभा निरीक्षक, माजी आमदार कृष्णा हेगडे, मुंबई यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतसाहेब, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी तालुक्यात केलेल्या कार्याचा अहवाल पाहून अभिमान वाटत असल्याचे व्यक्त केले. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने युवानेते श्रीकांत शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी १४-१५ महिन्यात चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांसाठी २० तास काम करतात, जनतेसाठी धावत आहेत, नालासपाई सारख्या कामात स्वतः हजर राहून सहभागी होत आहेत. शिवसेनेच्या महिला आघाडी तसेच युवा सेना अशा माध्यमातून सर्वांनी मोठ्या बळाने जनतेच्या तसेच पक्षाच्या हितासाठी जलद गतीने काम करा. शिवसेना म्हटले की, कोणत्याही संकटात शिवसैनिक त्या ठिकाण...

दलित पँथरच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मा.श्री.अभिमन्यू आठवले

मा.श्री.अभिमन्यु आठवले,  सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र  मा.श्री.अंबादास शिंदे सर यांनी दलित   पँथर   या संघटनेची स्थापना दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी केली आहे. या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.शिवश्री फत्तेसिहराजे भोसले आहेत.  मा.शिवश्री फत्तेसिहराजे भोसले  हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सा.  भवन येथे दिनांक २६.०८.२०२३ रोजी बैठक मा.शिवश्री फत्तेशिंहराजे भोसले यांचे अध्यक्षखाली होऊन त्या बैठकीत मा.श्री.अभिमन्यू आठवले यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  अभिमन्यु आठवले हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे ते साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र या वृत्त पत्राचे संपादक पत्रकार आहेत. AJFC राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे ते सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत, BRSS संघटनेचे संस्थापक आहेत. सडेतोड, निर्भीड जे दिसेल तेच परखडपणे  मांडतात. त्यांचेकडे अभ्यासूपणा आहे, त्यांची लोकप्रियत्ता प्रचंड आहे ते मवाळवादी व ...

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे नांदेड येथे 18वे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन : सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.डॉ.अभिमन्यू आठवले

उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या संघटनेचे 18 वे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन नांदेड येथील नरहर करुंदकर सभागृह येथे होणार आहे.  पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय  प्रश्नाचे जानकार वरिष्ठ पत्रकार जतीन देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पहिले सत्र उदघाटन व पत्रकार परिचय, दुसरे सत्र वरिष्ठ पत्रकार मुलाखत, तिसरे सत्र पत्रकारिता काल-आज-उद्या या विषयी मार्गदर्शन असणार आहे. चौथे सत्र समारोपाचे असून राज्यातील पत्रकार व मान्यवर यांचे सत्कार होणार आहेत. तरी राज्यातील पत्रकारांनी नांदेड येथील संमेलनात मोठया संख्येने सहभागी होवे असे आवाहन राष्ट्रीय कार्यकारणी, राज्य कार्यकारणी यांनी केले आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क  संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले  ९४२०३०२५६१  उपसंपादक : वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद...

दमदाटी केल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी नातेपुते गाव बंद ठेऊन केला निषेध

  संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते.ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे १ डिसेंबर २०२३ रोजी नातेपुते गाव बंद करून  निषेध घडलेल्या घटनेचा निषेध नातेपुते   ग्रामस्थांनी  केला. सविस्तर माहिती अशी कि, बरडकर मळ्यातील जमिनीबाबत बाबा माने व इतर सहकाऱ्यांनी नातेपुते नगरपंचायत कर्यालयातील कामकाज संपल्या नंतर नातेपुते कार्यालयासमोर बरडकर मळ्यातील लोकांना व नगरसेवक यांना दमदाटी, अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे नातेपुते ग्रामस्थांच्यावतीने नातेपुते बंद ठेऊन घडलेल्या घटनेची फेरी काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेऊन नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि संपागे साहेब यांना निवेदन ग्रामस्थांनी दिले.  नातेपुते येथील बरडकर मळ्यातील गट नं १०९ मधील काही क्षेत्र विभागातून रहिवाशी विभागामध्ये समाविष्ठ करण्याचा प्रयत्न चालू आहे. दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी ठराव एकमताने ना मंजूर केला. परंतु दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पुन्हा दुबारा अर्ज करून तो मंजूर करण्याचा प्रयत्न केला गेला अशी माहिती मिळाली. या बंदवेळी एन.के.साळवे, उत्तम बरडकर, रावसाहेब पांढरे, प्रवीण काळे, विशाल साळ...

वधू वर सूचक प्रसार संकल्पना

 साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र सध्या लग्न जमविणे अवघड जागेचे दुखणे झाले आहे. एकमेकांना कुटुंबाची माहिती मिळत नाही , त्यामुळे लग्न जमविण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता दूर करण्यासाठी व मुले मुलींची माहिती एकमेकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी लग्न जमवून आणण्यासाठी आम्ही   वधूवर सूचक संकल्पना   हे नाव देऊन त्या धर्तीवरती बौद्ध समाजातील कुटुंबासाठी एक चांगला उपक्रम हाती घेत आहोत.  अनेक पालकांच्या आग्रहामुळे हे पवित्र कार्य एकमेकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले पाहिजे जेणेकरून एकमेका कुटुंबाना संपर्क साधता येईल. पालकांनी मुला-मुलींचे बोयोडाटा पाठवावेत , त्यानुसार एकमेकांना त्याचा फायदा होईल , कुटुंब जुळून येतील हे उद्धिस्ट आहे. हा एक उपक्रम नाते जोडण्याचा राहील. पालकांना मुला-मुलींची लग्नाविषयी चिंता आहे.   मुला-मुलींचे वय वाढत आहेत त्यामुळे जनहितार्थ म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. जे पालक मुला-मुलींचे लग्नाविषयी बायोडाटा पाठवितील त्याप्रमाणे ती माहिती एकमेका कुटुंबाकडे पाठविली जाईल. योग्य आवड निवड संपर्क साधून पालकांनी करावी. मा.श्री.अभिमन्य...

शिवसेना भवन (शिंदे गट) नातेपुते येथे मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्याहस्ते प्रवीण संजय जाधव या डॉक्टरचा सन्मान

उपसंपादक: वैभव आठवले, साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र कु.प्रवीण संजय जाधव या विद्यार्थ्याला हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पेठ वडगाव कोल्हापूर येथे बी.ए.एम.एस या वैद्यकीय कोर्ससाठी शासकीय कोट्यातून फ्री मध्ये प्रवेश मिळाला त्याबद्दल त्याचा व वडील संजय जाधव सह मामा विशाल कुलकर्णी यांचा सत्कार शिवसेना भवन माळशिरस तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्याहस्ते पार पडला. घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असताना वडील नातेपुते येथील पांढरे इलेक्ट्रॉनिक या दुकानात मजुरीने जातात. आई चंद्रप्रभू इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिपाई कामगार म्हणून कार्यरत आहे. एवढी हालाखीची परिस्थिती असताना देखील कोणतेही ट्युशन नाही, कोणतेही क्लासेस नाहीत. एकविसाव्या शतकात टीव्ही, मोबाईलला समाजात दोष दिला जातो परंतु प्रवीण याने मोबाईलकडे बघणाऱ्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले असे म्हणावे लागेल. कारण याच मोबाईलच्या माध्यमातून युट्युबच्या माध्यमातून अभ्यास करून त्याने तब्बल 457 गुण मिळवले, त्याचे ऍडमिशन मोफत झाले आहे.  शिवसेनेच्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आन...

खरेदी केलेल्या जागा, जमिनीची गावपातळी वरती नोंद धरण्यास तलाठी, सर्कल यांच्याकडून दप्तर दिरंगाई कायद्याला बगल हि चिंताजनक गंभीर बाब

मा.श्री.डॉ.अभिमन्यू बी. आठवले संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र संपादक : मा.श्री.डॉ. अभिमन्यू आठवले   (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) कोणतेही सरकार असू द्या त्या सरकारचे अधिकारी, कर्मचारी यांना  "ना भीती ना चिंता''  असे अंग वळणी प्रत्येक विभागातील यांना पडले आहे. अधिकारी, कर्मचारी हे आर्थिक चिरीमिरीची अपेक्षा ठेऊन असतात. अधिकारी व कर्मचारी भरमसाठ पगार असताना सुद्धा चिरीमिरीची वाट बघतात या मध्ये ग्रामपंचायत शासकीय कर्मचारी असो वा अधिकारी टक्केवारीचे भुकेले असतात. त्यामध्ये महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी जोमात असतात ''द्या आणि करून घ्या''  असे समीकरण आहे. दुय्यम निबंधक यांच्या मार्फत जागा, जमिनी शासकीय स्टॅम्प वरती आर्थिक व्यवहार केलेला असतो. नियमानुसार फी भरलेली असते तरीही गाव पातळीवरील तलाठी, सर्कल नोंदी धरण्यास टाळाटाळ करतात, ते आर्थिक चिरीमिरीची अपेक्षा ठेवतात ही वेदनादायी आहे. हे जनतेचा छळ, मानसिक त्रास करतात असे संपादक म्हणून अनुभवले आहे, पाहिले आहे. जे दिसते तेच मी निर्भिडपणे मांडतो. सगळेच अधिकारी, कर्मचारी चिरीमिरी घेतात असे नाही. ५०% ...

डॉ.बा.ज.दाते प्रशाला व माध्यमिक महाविद्यालयातील सन २०००-२००१ बॅचचा माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र दि.१६-११-२०२३ रोजी नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील डॉ.बा.ज.दाते प्रशालेतील  सन २०००-२००१ दहावी बॅचचा माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी या स्नेहमेळाव्याला प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी  २२-२३ वर्षांनंतर एकत्र आल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. जुने मित्र भेटल्याने शाळेतील आठवणी जाग्या झाल्या. कार्यक्रमाची रूपरेषा शाळेच्या वर्गासारखी असल्याने सर्वांना शाळेत घालवलेले जुने क्षण आठवले. या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणांहून विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.  तसेच या स्नेह मेळाव्यानिमित आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, शिक्षकांचे मनोगत तसेच विद्यार्थ्यांचे मनोगत घेण्यात आले व  विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. फनी गेम्स, मनोरंजन कार्यक्रम, स्नेह भोजन इ. कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी या स्नेह मेळाव्यानिमित आलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमाला टोमके मॅडम, मदने मॅडम, एम. पी कुलकर्णी मॅडम, मुल्ला मॅड...

माळशिरस तालुका शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख मा. श्री. राजकुमार हिवरकर-पाटील यांचे गाव तिथे शाखा काढण्याची घौडदौड दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर अलंकापुरी येथे शाखेचे दिमाखदार उदघाटन

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र       महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील हे तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबवले आहेत यामध्ये आरोग्याचा विषय आहे. यामध्ये बचत गटातील महिलांचे आरोग्य तपासणी असेल, तालुक्यातील पाच ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी असेल, 99 हजार नागरिकांना शिवसेनेच्या वतीने सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेली डाळ असेल अशा विविध उपक्रमांनी शिवसेना नेहमीच चर्चेत राहिलेली आहे.      दि.१४/११/२०२३ दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दहिगाव मधील अलंकापुरी येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन दिमाखात पार पडले. यासाठी जिल्हा परिषद गटप्रमुख प्रमोद चिकणे, अध्यक्ष विजय ढेकळे, उपाध्यक्ष सागर वलेकर त्याचबरोबर गणेश गोफने, महेंद्र वलेकर हर्षवर्धन देशमाने, ओंकार पु...

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री.रणजितसिंहदादा नाईक-निंबाळकर यांची शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या शिवसेना भवन कार्यालयास भेट

       माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री.रणजितसिंहदादा नाईक-निंबाळकर यांची शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या शिवसेना भवन कार्यालयास भेट संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र माढा लोकसभा मतदारसंघाचे कलियुगातील भगीरथ म्हणून ज्यांची ओळख आहे असे खासदार माननीय श्री.रणजितसिंहदादा नाईक-निंबाळकर यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे धडाडीचे शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या शिवसेना भवन या कार्यालयात भेट देऊन राजकुमार हिवरकर-पाटील यांना तसेच शिवसेनेचे नेते पदाधिकारी शाखाप्रमुख व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या.      कलियुगातील भगीरथ अशी ओळख असणारे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिवाळीच्या पूर्व संधेला माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या नातेपुते येथील शिवसेना भवन येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तालुकाप्रमुख या नात्याने शिवसेनेने माळशिरस तालुक्यामध्ये केलेल्या कामाचा कार्य अहवाल पाहिला व पाहताक्षणी त्यांच्या असे निदर्शनास आले की, एवढ्या सगळ्या बातम्या एवढी सगळी कामे बघून खूप कौ...

मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब यांनी पुकारलेल्या एल्गार मेळावा यासाठी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी अंबड जिल्हा जालना येथे लाखोंच्या संख्येने जाण्यासाठी नातेपुते येथे ओबीसी समाज बांधवांची आढावा बैठक संपन्न

  या बैठकीला मार्गदर्शन करताना मा.श्री.अॅड. माजी आमदार रामहरी रूपनवर साहेब  उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी 17 नोव्हेंबर रोजी अंबड जिल्हा जालना येथे ओबीसी समाजाचा एल्गार पुकारलेला आहे या सभेच्या नियोजनासाठी शंकरराव कॉम्प्लेक्स नातेपुते ता.माळशिरस याठिकाणी ओबीसी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. यावेळी विधान परिषद माजी आमदार रामहरी रुपनवर, एडवोकेट बी वाय राऊत, अध्यक्ष ओबीसी मोर्चा भाजपा, श्री राजकुमार हिवरकर पाटील तालुकाप्रमुख शिवसेना, श्री रावसाहेब पांढरे नगरसेवक, भीमराव फुले जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, सौ सीमाताई एकतपुरे, एडवोकेट राऊत वेळापूर, ऍडव्होकेट ताठे वेळापूर, श्री सोमनाथ पिसे शेतकरी संघटना, देविदास ढोपे सरपंच पुरंदावडे पोपट बोराटे, सरपंच फोंडशिरस सुनील गोरे तालुकाध्यक्ष ओबीसी मोर्चा राष्ट्रवादी, संभाजी फुले सर, कैलास बरडकर, अर्जुन जठार, विनायक शिंदे, नारायण बोराटे, उत्तम बरडकर अशोक राऊत संदीप बरडकर समाधान माळी उमाजी बोडरे जिल्हाध्यक्ष उमाजी नाईक रामोशी संघटना शिवाजी कोळी तंटामुक्ती अध्यक्ष, सुधाकर राऊत, नारायण बो...

शासनाच्या सर्व योजना गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हेच ध्येय उद्दिष्ट्ये - राजकुमार हिवरकर-पाटील

उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र           पिरळे येथे शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने दिवाळीनिमित्त एका आधार कार्ड वर ५ किलो ६० रुपये किलो दराप्रमाणे सवलतीच्या दरात हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली.       यावेळी बोलताना व्यासपीठावर  पिरळेचे सरपंच सुनील दडस माजी सरपंच, संदीप नरळे चेअरमन, वसंत दडस माजी सरपंच, शिवाजी लवटे माजी उपसरपंच, अमोल बापू शिंदे, दत्तू लवटे, दादा लवटे, उमेश खिलारे जिल्हा परिषद गटप्रमुख अनिल दडस, पिरळे शाखाप्रमुख आकाश खिलारे, उपप्रमुख उमेश जाधव, दहिगाव जिल्हा परिषद गटाचे प्रमोद चिकणे, नातेपुते नगरपंचायतचे गटनेते दादाभाई मुलाणी, प्रभाग ७ प्रमुख सनी बरडकर, जय महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत, उपाध्यक्ष राजू जाधव, सचिव माऊली देशमुख व शेकडो ग्रामस्थ बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.      यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी शासन आपल्या दारी ही योजना ...

माळशिरस तालुक्यात राजकुमार हिवरकर-पाटील शिवसेना तालुकाप्रमुख यांच्यावतीने पंचाहत्तर हजार कुटुंबांना डाळीचे वाटप

शिवसेनेच्या वतीने सवलतीच्या दरात डाळ वाटप करताना माळशिरस तालुका प्रमुख शिवसेना राजकुमार हिवरकर पाटील जय महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत माऊली देशमुख पत्रकार तानाजी वाघमोडे  ,पत्रकार संजय हुलगे,पत्रकार शोभा वाघमोडे, पदाधिकारी व ग्रामस्थ. उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या वतीने आलेल्या प्रत्येक आधार कार्डाला ५ किलो सवलतीत ६० रुपये प्रमाणे हरभरा डाळ वाटपाच्या उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  त्याचबरोबर संवेदनशील मुख्यमंत्री यांनी शासन आपल्या दारी योजना आणून सर्वसामान्यांना एक वेगळा पायंडा  पाडला  त्याच धर्तीवर दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर नारीशक्तीचा सन्मान म्हणून माता-भगिनींसाठी शिवसेनेच्या वतीने जणू मुख्यमंत्र्यांच्या कार्याची प्रचितीच आणून दिली.  शिवसेनेच्या वतीने सवलतीच्या दरातील डाळ आज माळशिरस मध्ये अहिल्यादेवी न...

दलित पँथरची नव्याने स्थापना ( ३ ऑगस्ट २०२३)

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र दलित पँथर नावाची संघटना संपूर्ण देशाला ओळख आहे परंतु दलित पँथर ही चळवळ संपू नये ती चालू रहावी यासाठी नव्याने दलित पँथरची स्थापना दि.०३ ऑगस्ट २०२३ संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अंबादास शिंदे सर यांनी करून चळवळ गतिमान करण्यासाठी , अन्याय-अत्याचारा विरोधी लढा देण्यासाठी हक्क व अधिकार मिळविण्यासाठी दलित पँथर संघटनेची बांधणी केली जात आहे.  या दलित पँथर संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशेज शिवश्री फत्तेसिंहराजे भोसले हे या दलित पँथर संघटनेचे नूतन अध्यक्ष आहेत. मा.अंबादास शिंदे सर यांनी ॲट्रोसिटी अॅक्ट , मी विद्रोही , द ग्रेट सम्राट अशी पुस्तके लिहली आहेत. सरकारी अधिकारी यांना घाम फोडणारे मा.अंबादास शिंदे सर आहेत. या दलित पँथर संघटनेचे २३ जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. ज्या कार्यकर्त्यांना या संघटनेत जिल्हा कार्यकारणी , तालुका कार्यकारणी , गाव पातळीवर शाखा व त्याचे अध्यक्ष व कार्यकारणीवरती काम करावयाचे असेल त्यांनी ९८९०९ ८८०१४ वरती संपर्क करावा.  अनेक वर्षे दलित पँथर या संघटनेत मा.अंबादास शिंदे सर...