उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे यलम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून भागवात एकादशी दिवशी पालखी पुजारी नारायण मनोहर पोरे यांच्या निवासस्थानापासून देवीच्या मंदिरापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली. वार रविवार दि.२४-१२-२०२३ रोजी यलम्मा देवीला नैवद्य दाखविण्याचा कार्यक्रम असतो व वार सोमवार दि.२५-१२-२०२३ रोजी सोमवार या दिवशी पालखी नवसाची आहेर घेण्यासाठी भक्तांच्या घरी जाते. आहेर घेवून आलेनंतर पालखी कुंडाच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी जाते.
त्यानंतर मंदिराजवळ देणगीदारांचा व इतरांचा सहकार्य केल्याबद्दल सन्मान केला जातो. त्यानंतर पुजारी नारायण मनोहर पोरे, ज्योतीराम उर्फ परशुराम पोरे इ. यांचा होमाचा कार्यक्रम असतो. त्या होमातून ते जात असतात. या देवस्थानची स्थापना होऊन १०० वर्षे पूर्ण होत आहे, मंदिर पुर्णपणे दगडी आहे.
२४-१२-२०२३ व २५-१२-२०२३ या दोन दिवसात यात्रा संपन्न होते. या यात्रेवेळी लहान मुलांची खेळणी, खाद्यपदार्थ इ. दुकाने, पाळणे येत असतात. तरी सर्व भक्तांनी या यात्रेचा आनंद घ्यावा.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.