संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते.ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे १ डिसेंबर २०२३ रोजी नातेपुते गाव बंद करून निषेध घडलेल्या घटनेचा निषेध नातेपुते ग्रामस्थांनी केला. सविस्तर माहिती अशी कि, बरडकर मळ्यातील जमिनीबाबत बाबा माने व इतर सहकाऱ्यांनी नातेपुते नगरपंचायत कर्यालयातील कामकाज संपल्या नंतर नातेपुते कार्यालयासमोर बरडकर मळ्यातील लोकांना व नगरसेवक यांना दमदाटी, अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे नातेपुते ग्रामस्थांच्यावतीने नातेपुते बंद ठेऊन घडलेल्या घटनेची फेरी काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेऊन नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि संपागे साहेब यांना निवेदन ग्रामस्थांनी दिले.
नातेपुते येथील बरडकर मळ्यातील गट नं १०९ मधील काही क्षेत्र विभागातून रहिवाशी विभागामध्ये समाविष्ठ करण्याचा प्रयत्न चालू आहे. दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी ठराव एकमताने ना मंजूर केला. परंतु दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पुन्हा दुबारा अर्ज करून तो मंजूर करण्याचा प्रयत्न केला गेला अशी माहिती मिळाली. या बंदवेळी एन.के.साळवे, उत्तम बरडकर, रावसाहेब पांढरे, प्रवीण काळे, विशाल साळवे, सागर बिचुकले, बादल सोरटे, सुशील काळे, शशिकांत कांबळे, नीलकंठ राऊत यांनी निषेध पर विचार व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक ऍड.बी.वाय.राऊत, नगरसेवक दादासाहेब उराडे, नगरसेवक दीपक काळे, शशिकांत बरडकर, संतोष काळे, बाळासाहेब पांढरे, अजय भांड, संदीप ठोंबरे, भैय्या चांगण, डॉ.वैभव कवितके, गणेश उराडे, गणेश पागे, सुनील बरडकर, रणजित जठार, अमोल पाडसे, सतीश बरडकर, सावता बोराटे, गणेश कुचेकर, जनार्धन बरडकर इत्यादी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु अशा दमदाटी करणाऱ्यांच्या पाठीशी कोण? दमदाटी करणारे होते त्यांची नातेपुते नगरपंचायतकडे कोणती मागणी होती? ती अधिकृत कि अनाधिकृत होती? हेही जनतेला कळाले पाहिजे असे जनतेतून बोलले जात आहे. असे निवेदन नातेपुते नगरपंचायत व नातेपुते पोलिस स्टेशनकडे देण्यात आले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१