उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
शिवसेना भवन नातेपुते येथे शिवसेनेचे राज्य उपप्रमुख तथा राष्ट्रीय प्रवक्ता सोलापूर जिल्हा, माढा लोकसभा निरीक्षक, माजी आमदार कृष्णा हेगडे, मुंबई यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतसाहेब, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी तालुक्यात केलेल्या कार्याचा अहवाल पाहून अभिमान वाटत असल्याचे व्यक्त केले. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने युवानेते श्रीकांत शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी १४-१५ महिन्यात चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांसाठी २० तास काम करतात, जनतेसाठी धावत आहेत, नालासपाई सारख्या कामात स्वतः हजर राहून सहभागी होत आहेत. शिवसेनेच्या महिला आघाडी तसेच युवा सेना अशा माध्यमातून सर्वांनी मोठ्या बळाने जनतेच्या तसेच पक्षाच्या हितासाठी जलद गतीने काम करा. शिवसेना म्हटले की, कोणत्याही संकटात शिवसैनिक त्या ठिकाणी हजर असतो. माढा लोकसभा तसेच माळशिरस विधानसभा क्षेत्रात मिशन २०२४ च्या निमित्ताने शिवसेनेची सदस्यता मोहीम राबविणे, कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त सदस्य करणे ३३८० बुथ प्रमुखांसह शिवदूतांची संख्या वाढविण्याचे कार्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनतेसाठी असलेल्या सर्व योजना महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवून येणाऱ्या २०२४ साठी लोकसभा तसेच विधानसभेच्या सर्वाधिक जागा जिंकून नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी महायुती कार्यरत असल्याचे सांगितले.
शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी आजपर्यंत केलेला कार्याचा आढावा सांगताना जवळपास बाराशे विद्यार्थ्यांना वह्या वाटप, ६०१० रुग्णांचे मोफत ऑपरेशन ९९ हजार लोकांपर्यंत सवलतीच्या दरात हरभरा डाळीचे वाटप, ३८ हजार महिलांची मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार केले आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयातील पुरविल्या जाणाऱ्या रुग्णसेवेच्या सुविधांमुळे आरोग्याची यंत्रणा चांगली कार्यरत आहे. या विविध कार्याच्या माध्यमातून शिवसेना तालुक्यातील घराघरापर्यंत पोहोचविल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना प्रवक्ता तथा राज्य उपप्रमुख माजी आमदार कृष्ण हेगडे, माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील, तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे, गटनेते दादाभाई मुलाणी, शहरप्रमुख पोपटराव शिंदे, मनोज जाधव, तेजस गोरे, सुनील बनकर, अनिल दडस, आकाश सोरटे अक्षय सोरटे, राजू भाई मुलाणी, प्रशांत जगताप, विजय ढेकळे, सागर वलेकर, गणेश गोफणे, मनोज वेदपाठक, करण ढेकळे, सागर जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिक हजर होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१