उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
दलित पँथर हे नाव देश पातळीवर गाजले आहे. या दलित पँथर संघटनेमुळे न्याय मिळत आहे. या संघटनेचे संस्थापक मा.श्री.अंबादास शिंदे सर आहेत. या संघटनेची स्थापना दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी केली. या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवश्री फत्तेसिंहराजे भोसले असून ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. हि संघटना सर्वधर्म समभाव आहे, अन्याया विरोधी आवाज उठविणारी संघटना म्हणून नाव आहे.
या दलित पँथर या संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी मा.श्री मनोज राऊत सर यांची निवड तर नातेपुते शहर अध्यक्षपदी मा.श्री.सनी श्रीकांत बाविस्कर यांच्यानिवडी संस्थापक अध्यक्ष मा.अंबादास शिंदे सर तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवश्री फत्तेसिंहराजे भोसले यांच्या आदेशानुसार दिनांक १०.१२.२०२३ रविवार या दिवशी नियुक्ती पत्र देऊन सोलापूर जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष मा.श्री.अभिमन्यू आठवले यांनी निवड जाहीर केली.
या निवडी झाल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र चॅनलचे संपादक मा.श्री.प्रमोद शिंदे सर यांनी त्यांच्या कार्यालयात दलित पँथर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.अभिमन्यू आठवले, माळशिरस तालुका अध्यक्ष मा.श्री. मनोज राऊत सर, नातेपुते शहर अध्यक्ष मा.श्री.सनी श्रीकांत बाविस्कर यांचे सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१