उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
मा.श्री.अंबादास शिंदे सर यांनी दलित पँथर या संघटनेची स्थापना दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी केली आहे. या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.शिवश्री फत्तेसिहराजे भोसले आहेत. मा.शिवश्री फत्तेसिहराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सा. भवन येथे दिनांक २६.०८.२०२३ रोजी बैठक मा.शिवश्री फत्तेशिंहराजे भोसले यांचे अध्यक्षखाली होऊन त्या बैठकीत मा.श्री.अभिमन्यू आठवले यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अभिमन्यु आठवले हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे ते साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र या वृत्तपत्राचे संपादक पत्रकार आहेत. AJFC राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे ते सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत, BRSS संघटनेचे संस्थापक आहेत. सडेतोड, निर्भीड जे दिसेल तेच परखडपणे मांडतात. त्यांचेकडे अभ्यासूपणा आहे, त्यांची लोकप्रियत्ता प्रचंड आहे ते मवाळवादी व जहालवादी विचाराचे म्हणून ओळखले जातात व त्यांचे नाव आहे.
लहान असो वा मोठे सर्वांचा आदर करतात. उच्च शिक्षित आहेत, निर्व्यसनी आहेत. जो पर्यंत शांत तो पर्यंत शांत, शांततेत क्रांती करतात, कुणावर हि अन्याय होऊ नये असे त्यांचे मत असते. अन्याय करणाऱ्यांचा मग कर्दनकाळ म्हणून मागे लागतात, खेळ संपवितात.
दलित पँथर या संघटनेचे संस्थापक मा.अंबादास शिंदे सर यांचे २० वर्ष जिवाभावाचे आठवले यांचे संबध आहेत. दलित पँथर च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी आठवले यांची नियुक्ती केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१