उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
मा.अंबादास शिंदे सर यांनी ३ ऑगस्ट २०२३ रोजी दलित पँथर या संघटनेची स्थापना करून चळवळ गतिमान करण्यासाठी जिल्हा कार्यकारणी, तालूका कार्यकारणी पदाधिकारी नेमून जबरदस्त संघटना उभी केली जात आहे. या संघटनेत असंख्य जाती धर्माचे कार्यकर्ते सामील होत आहेत. जनतेच्या अडि-अडचणी सोडविण्यासाठी, अन्याला वाचा फोडण्यासाठी हि संघटना जनतेसाठी वरदान ठरणार आहे. या संघटनेचे संस्थापक मा.अंबादास शिंदे सर हे प्रचंड कायद्याचे अभ्यासक आहेत. शासकीय, निमशासकीय दरबारी त्यांचा वचक आहे. हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत मागे हटत नाही., सडेतोड, निर्भीड, रोखठोक, विचारवंत म्हणून त्यांची देश पातळीवर ओळख आहे.
मा.अंबादास शिंदे सरांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट, द ग्रेट सम्राट, मी विद्रोही, अशी अनेक पुस्तके लिहली आहेत. तसेच ते साप्ताहिक बंडखोर या वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार मालक आहेत. त्यांनी असंख्य लोकांना न्याय दिला आहे, माफी मागणे त्यांच्या स्वभावात बसत नाही, कायद्यानुसारच न्याय देण्याचा प्रयत्न असतो, अनधिकृत काम करून देत नाहीत हे मी त्यांच्या सहवासातून अनुभवावरून लिहीत आहे. आतापर्यंतचे त्यांचे सामाजिक कार्य अतिशय महत्वाचे ठरले आहे. एखाद्याचा विश्वासघात करणे त्यांच्या रक्तात नाही.
तसेच दलित पँथर या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.शिवश्री फत्तेसिंहराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. हे दोघेही नेते जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आहेत. दलित पँथरच्या नावाची ओळख हि जातीभेद करणाऱ्या ना उरात धडकी भरवणारी आहे, जे जातीवाद करतील त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. दलित पँथर हि संघटना महाराष्ट्र राज्यात २३ जिल्यात मोठया जोमाने वाढत आहे.
ग्रामीण तसेच शहरामध्ये या संघटनेत कार्यकर्ते सामील होत आहेत. या संघटनेत जे कुटुंब सामील आहेत त्यांना घाबरण्याचे कारण नाही. ही संघटना सर्व जाती-धर्मांना आपली वाटू लागली आहे. या संघटनेने महाराष्ट्र राज्यात गती घेतली आहे. शेकडो कार्यकर्ते या संघटनेत सामील होत आहेत. या संघटनेची बांधणी जोरात चालू आहे. या दलित पँथर संघटनेमुळे कार्यकर्त्यामध्ये जोश आला आहे. हि संघटना कोणावर हि विनाकारण अन्याय करणार नाही, जनतेला हि संघटना आधार वाटू लागली आहे. मी अभिमन्यू आठवले सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आवाहन करतो कि, या दलित पँथर संघटनेत सामील व्हा.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१