मा.श्री.अंबादास शिंदे, संस्थापक अध्यक्ष दलित पँथर, महाराष्ट्र राज्य |
उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नाव: अंबादास सैदू शिंदे, जन्म: ०१-०४-१९४९, जन्म गाव: कुसळंब, ता.बार्शी, जि.सोलापूर, महाराष्ट्र,
शिक्षण: बी.ए. (स्पेशल भूगोल ), बी.एड (भूगोल, इंग्रजी ) सी.सी.जे जर्नालीजम,
नोकरी: सेवा निवृत्त मुख्याध्यापक, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर.
भोगलेली पदे:
मुख्य संपादक, मालक साप्ताहिक 'बंडखोर' सोलापूर 1985, माजी जिल्हा अध्यक्ष, दलित पॅन्थर सोलापूर (१९७६-७८), माजी अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक निधी समिती सोलापूर, माजी जिल्हा संघटक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी खजिनदार रिपब्लिकन स्टुडंट असोसिएशन, दयानंद कॉलेज सोलापूर, सरचिटणीस शिक्षक कर्मचारी संघटना, माजी सदस्य पशुपक्षी बळी प्रतिबंध समिती सोलापूर, माजी संघटक यंत्रमाग कामगार संघर्ष समिती सोलापूर, माजी फुटबॉल सेक्रेटरी दयानंद कॉलेज, सोलापूर.
त्यांची आतापर्यंतची कामगिरी:
नामांतर मोर्चा (१०,०००) पँथर्स सोलापूर ते दिल्ली, पँथरचा नंगा मोर्चा, अनेक नामांतर मोर्चा, मशाल मोर्चा,
उपोषणे: २१
सर्वात अधिक ४५ दिवसाचे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपोषण, २७ दिवस शिक्षक महंमद हनीफ तांबोळी खून प्रकरणी उपोषण.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी ), ४५ च्या वरती केसेस हाताळ्या, यशोदा पुणे येथे कायद्याचे प्रशिक्षण, पुरस्कार व सन्मान सामाजिक कार्याबद्दल कुर्डुवाडी नगरपालिकेचे मानपत्र, करजगी (अक्कलकोट ) येथे धार्मिक सभेत दोन वेळेस सन्मान.
मुलाखत: वृत्तदर्शन सोलापूर, ऍट्रॉसिटी कायाद्यासंबंधी माहिती व अनुभव कथन, लेखन: विविध वृत्तपत्रातून लेखन, आत्मचरित्र 'मी विद्रोही', अनेक सामाजिक, परिवर्तनवादी, विशेषकांचे प्रकाशन व संपादन, आगामी प्रकाशन, मानवाधिकार-कायदे-निकाल असे अंबादास शिंदे सर यांचा कार्यकाल आहे. तसेच लाखो लोकांची कामे केली आहेत, न्याय दिला आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१